breast cancer  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breast Cancer: लहान वयात महिलांना का होतोय स्तनाचा कर्करोग? जाणून घ्या

Breast Cancer: काही दशकांपूर्वीपर्यंत 50 वर्षांवरील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आढळत असत, परंतु आता 30 ते 40 वर्षे वयोगटातील महिला या कर्करोगाच्या बळी ठरत आहेत.

Manish Jadhav

Breast Cancer: काही दशकांपूर्वीपर्यंत 50 वर्षांवरील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आढळत असत, परंतु आता 30 ते 40 वर्षे वयोगटातील महिला या कर्करोगाच्या बळी ठरत आहेत. ICMR च्या मते, 2020 मध्ये भारतात कर्करोगाच्या 13.9 लाख रुग्णांची नोंद झाली होती, जी 2025 मध्ये जवळपास 15 लाखांपर्यंत पोहोचू शकते. महिलांमध्ये कर्करोगाच्या एकूण रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग अव्वल आहे. गेल्या दशकात या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण लहान वयातच स्तनाचा कर्करोग का होतो? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

दरम्यान, अनेक कारणांमुळे महिलांना लहान वयातच स्तनाच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. स्तनाच्या कर्करोगाचे पहिले कारण म्हणजे हार्मोन्सची पातळी खराब होणे. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या पातळीत बिघाड झाल्यामुळे हे घडते. याशिवाय, अनुवांशिक उत्परिवर्तनाचा प्रभाव देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबातील त्यांच्या आईला हा कर्करोग झाला असेल तर तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो.

खराब जीवनशैली आणि मद्यपान हे एक मोठे कारण

मासिक पाळी लवकर येण्यानेही या आजाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अति मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या जीवनशैलीतील घटकांमुळेही महिलांमध्ये (Women) या कर्करोगाचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षांत तरुणींमध्ये दारु पिण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे स्तनाच्या कर्करोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे. 20 ते 25 वर्षे वयोगटात स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये कर्करोगाचे कारण जीवनशैलीपेक्षा अनुवांशिक असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

SCROLL FOR NEXT