Car Insurance Tips Dainik Gomatak
लाइफस्टाइल

Car Insurance Tips: कारचा विमा काढण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

Car Insurance Tips: कारचा विमा काढताना नियम आणि अटी काळजीपुर्वक वाचले पाहिजे.

Puja Bonkile

Car Insurance Tips: आजच्या काळात कारचा विमा काढणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती नसते आणि त्यामुळे अनेकदा त्यांचे आर्थिक नुकसान होते. तुम्हीही कार विमा काढत असाल तर पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

  • तुमच्या गरजा समजून घ्या

कारचा विमा काढताना तुमच्या गरजा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भारतात प्रामुख्याने दोन प्रकारचे कार विमा आहेत. यामध्ये तृतीय पक्ष आणि सर्वसमावेशक विमा यांचा समावेश आहे.

  • नो क्लेम बोनस

विमा कंपन्यांकडून प्रीमियम पेमेंटवर क्लेम बोनस दिला जात नाही. अनेक वेळा कंपन्या अतिरिक्त शुल्क देखील लावतात आणि जर ते भरले नाही तर क्लेम केलेल्या विम्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नो क्लेम बोनसच्या वेळी तुम्ही विशेष काळजी घ्यावी.

  • थर्ड पार्टी

या प्रकारच्या विम्यामध्ये कंपनी दुसऱ्या पक्षाच्या नुकसानीची भरपाई करते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर समजा तुमचे वाहन दुसऱ्या वाहनाला धडकले आणि त्यामुळे नुकसान झाले, तर झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून केली जाईल. 1988 च्या वाहन कायद्यानुसार हे अनिवार्य आहे.

  • सर्वसमावेशक विमा

या प्रकारच्या विमामध्ये विमा कंपनी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतात.

  • योग्य क्लेम करणे गरजेचे

जर तुम्हाला विमा मिळाला असेल आणि तुम्हाला त्याचा योग्य प्रकारे क्लेम कसा करायचा हे माहित नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. अनेक वेळा, कार मालक घाईगडबडीत नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचत नाहीत, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हीही विमा घेण्याचा विचार करत असाल तर अटी आणि नियम काळजीपुर्व वाचावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT