Car Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Tips: कारला लागणारा जंग कमी करायचा असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

Car Tips: तुमची कार जंगत असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

car care tips how to secure your car from rust read full story

कारमध्ये गंज लागणे ही प्रत्येक कार मालकासाठी मोठी समस्या आहे. जर तुम्हाला तुमची कार गंजमुक्त ठेवायची असेल, तर काय करावे हे जाणून घेऊया.

कार गंजामुळे आपल्या कारचे बरेच नुकसान होते आणि तिचे सौंदर्य खराब होते. तुमच्या कारमध्ये अनेक ठिकाणी गंज येऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या कारची चांगली काळजी घेतली नाही आणि कारच्या पृष्ठभागावर गंज निर्माण होतो. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

किनारी भागात कारची विशेष काळजी घ्या

किनारी भागात आणि पर्वतांमध्ये गाडी गंजणे ही एक सामान्य गोष्ट आहे. किनारी भागात रस्त्यावर क्षार आढळते, ज्यामुळे तुमची कार केवळ घाण होत नाही तर ती वेगाने गंजते.

क्षार ऑक्सिजनच्या मदतीने पाण्यावर प्रतिक्रिया देतात. यामुळे तुमच्या वाहनाचा रंग लवकर खराब होतो.

यामुळे गाडी वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते. हिवाळ्यात पर्वतांमध्ये अनेकदा बर्फ पडतो, ज्यामुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची गाडी जास्त काळ टिकेल.

स्वच्छता आणि वॅक्सिंग गरजेचे

गंज आणि प्रदूषण तुमच्या कारच्या पृष्ठभाग खराब करू शकतात. अशावेळी गाडी नेहमी स्वच्छ करत राहणे गरजेचे आहे.

आपल्या वाहनाच्या पृष्ठभागावरील गंज टाळण्यासाठी स्वच्छता करणे आवश्यक आहे.

त्यामुळे तुमच्या कारवरील गंज रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे महिन्यातून एकदा तरी ती धुणे आणि व्हॅक्सिंग करणे हे महत्त्वाचे आहे.

तुम्ही तुमची कार जितकी जास्त स्वच्छ कराल तितकी ती गंजण्याची शक्यता कमी होईल.

वर्षातून किमान चार वेळा वॅक्सिंग करणे महत्त्वाचे आहे

स्क्रॅचपासून संरक्षण करा

कारचे स्क्रॅच आणि डेंट्सपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. कारण अशावेळी तुमच्या कारचा रंग किंवा संरक्षक थर काढून टाकला जाऊ शकतो. यामुळे तुमची कार कोणत्याही गंजाने सहजपणे प्रभावित होऊ शकते.

याशिवाय, तुम्ही तुमच्या वाहनात अँटी-रस्ट लुब्रिकंट लावू शकता. हे तुमच्या कारच्या धातूचे संरक्षण करण्यासाठी आहे.

ते कारमध्ये लावणे सोपे आहे आणि बऱ्याच वर्षांपासून आपल्या वाहन सुरंक्षित ठेवते.

133 words / 888 characters

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT