Cancer In Kids: भारतात दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लहान मुलेही या आजाराचे शिकार ठरत आहेत. मुलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरला 'पीडियाट्रिक कॅन्सर' म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये लहान मुलांना कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळे झाल्याचे आढळून आले आहे. मुलांमध्ये ब्लड कॅन्सरचेही प्रमाण जास्त आहे. याला 'ल्युकेमिया' म्हणतात. डाउन सिंड्रोम आणि अॅटॅक्सिया टेलॅंजिएक्टेसिया सारख्या काही अनुवांशिक समस्यांमुळे मुलांना ल्युकेमिया होतो. या आजारांवर उपचार करण्यासाठी लवकर त्याची लक्षणे ओळखणे गरजचे ठरते. एकदा लक्षणे लक्षात आली की, डॉक्टरांना उपचार करणे सोपे जाते.
पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी आणि हेमेटोलॉजी विभागाच्या संचालक डॉ. उष्मा सिंग यांनी सांगितले की, पीडियाट्रिक कॅन्सरचे वेळेवर निदान होणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच या कॅन्सरची लक्षणे ओळखली पाहिजेत. मुलांच्या (Child) बाबतीत, कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अधिक गरजेचे बनते. कारण मुलांमध्ये कॅन्सर सहज ओळखता येत नाही.
लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) आणि एक्यूट मायलोइड ल्युकेमिया (AML) सारखे ल्युकेमिया हे सर्वात सामान्य कॅन्सर आहेत. या नंतर, मेडुलोब्लास्टोमास आणि ग्लिओमास हे दुसरे सर्वात सामान्य कॅन्सर आहेत. याशिवाय, मुलांमध्ये न्यूरोब्लास्टोमा, लिम्फोमा, रॅबडोमायोसारकोमा आणि हाडांच्या कॅन्सरची प्रकरणे नोंदवली जातात. मुलांमध्ये कॅन्सरचे बहुतेक प्रकार अनुवांशिक असतात. याशिवाय, खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता लठ्ठपणा ही देखील मुलांमधील कॅन्सरची कारणे असू शकतात.
वारंवार ताप येणे
वजन कमी होणे
शरीरात रक्ताची कमतरता
भूक न लागणे
शरीराच्या कोणत्याही भागात गाठ होणे
अलिकडच्या काळात पीडियाट्रिक कॅन्सरच्या उपचारांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आता इम्युनोथेरपी आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढले आहे. ड्रग थेरपी आणि सीएआर टी-सेल थेरपीचा वापर पूर्वीपेक्षा जास्त होत आहे. पीडियाट्रिक कॅन्सरच्या (Cancer) उपचारांमध्ये या तंत्रांचा खूप फायदा होत आहे. तसेच, ब्लड कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये स्टेम सेल प्रत्यारोपण आता यशस्वी होत आहे, जरी रक्तदात्यांची अजूनही मोठी कमतरता आहे. यासाठी लोकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.