रोजच्या आहारात येणाऱ्या गोष्टी कर्करोगासाठी कारणीभूत ठरु शकतात हे विविध अभ्यासातून समोर येत आहे. आहार निरीक्षणासोबतच कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या अन्न घटकांचा देखील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. लिनोलिक आम्ल (अॅसिड) आणि स्तनाच्या कर्करोगात संबंध असल्याचे न्यूयॉर्क मधील कॉर्नेल मेडिसिनच्या अभ्यासातून समोर आले आहे. लिनोलिक अॅसिड खाण्याच्या तेलात आढळते.
रोजच्या आहारात येणाऱ्या गोष्टी कर्करोगासाठी कारणीभूत ठरु शकतात हे विविध अभ्यासातून समोर येत आहे. आहार निरीक्षणासोबतच कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या अन्न घटकांचा देखील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. लिनोलिक असिड आणि स्तनाच्या कर्करोगात संबंध असल्याचे न्यूयॉर्क मधील कॉर्नेल मेडिसिनच्या अभ्यासातून समोर आले आहे. लिनोलिक अॅसिड खाण्याच्या तेलात आढळते.
लिनोलिक अॅसिड स्तानाच्या कर्करोगाचा धोका कसा वाढवते?
ओमेगा - ६ फॅटी अॅसिड म्हणून ओळखले जाणारे लिनोलिक अॅसिड कॉर्न ऑईल, सोयाबीन ऑईल आणि सूर्यफूल तेलात आढळते. त्वचेसाठी उत्तम असणारे हे तेल स्तानाच्या कर्करोगाला प्रोत्साहन देण्यासाठी कारणीभूत ठरु शकते.
स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणात या प्रकारचा कर्करोग १५ टक्के आढळतो आणि त्याचा पसरण्याचा वेग इतरांपेक्षा अधिक असतो. कर्करोगांच्ये पेशीत आढळणारी FABP5 प्रथिनी लिनोलिक अॅसिडमध्ये देखील आढळतात. यामुळे Mtorc1 सक्रिय होतात. याचा कर्करोगाच्या पेशींच्या वाढीचा प्रमुख चालक मानले जाते, यामुळे ट्युमरचा देखील विकास होतो.
लिनोलिक आम्ल म्हणजे काय?
लिनोलिक अॅसिड मानवी शरीरराला आवश्यक असणारे एक पोषक तत्व आहे. अन्नातून ते मिळणे अपेक्षित असते. पण, जास्त चरबीयुक्त आहार आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्याने मोठ्या प्रमाणावर जळजळ होऊ शकते आणि कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. यामुळे खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. कारण, यापूर्वी लिनोलिक आम्प आणि स्तनाच्या कर्करोगाचा संबंध आढळून आलेला नाही.
दरम्यान, स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे कर्करोग होतो, असा याचा निष्कर्ष काढण्याची गरज नाही, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. पण, याचा उच्च जोखीम गटात असलेल्या लोकांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे निरोगी आणि संतुलित आहार घेणं महत्वाचे ठरते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.