Cake Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cake Recipe: फक्त 10 मिनिटांत घरीच झटपट बनवा बिस्किट केस, नोट करा रेसिपी

ख्रिसमस डे अवघ्या तिन दिवसावर येऊन ठेपला आहे. तुम्ही घरी केक बनवण्याचा प्लॅन करत असाल तर बिस्किट तयार करू शकता.

Puja Bonkile

Cake Recipe: ख्रिसमस असो किंवा इतर कोणताही उत्सव असो, लोक अनेकदा बाजारातून केक आणतात. पण यंदा ख्रिसमसला घरीच स्वस्तात मस्त आणि टेस्टी केक तयार करू शकता. अनेक लोकांना असे वाटते की बिस्किट केक बनवणे हे एक कठीण काम आहे, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. फक्त 10 मिनिटांत केक घरी बनवता येतो. यासाठी तुम्हाला बिस्किटे आणि काही छोट्या गोष्टी हव्या आहेत. फक्त 10 मिनिटांत बिस्किट केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. 

  • बिस्किट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बिस्किट - 2 मोठे पॅकेट

साखर - 2 चमचे

काजू - 6

दूध - 1 ग्लास

इनो - 1 टीस्पून

चॉकलेट

  • बिस्किट केक बनवण्याची कृती

बिस्किट केक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घेऊ शकता. बिस्किटांची 2 पॅकेट न उघडता रोलिंग पिनच्या मदतीने बारीक करावे. यानंतर तुटलेली बिस्किटे एका भांड्यात ठेवावी.

आता तुम्हाला 1 ग्लास दूध भांड्यात टाकावे लागेल आणि पिठात चांगले मिक्स करावे लागेल. पीठ चांगले तयार झाल्यावर त्यात साखर घालावी. बिस्किट आधीच गोड असल्याने तुम्ही जास्त साखर टाकू नका.

आता तुम्हाला पिठात इनो घालावे लागेल आणि चमच्याला 30 सेकंद गोलाकार गतीने फिरवून ते पिठात मिसळावे लागेल. आता पीठ झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता एक भांड घ्या आणि त्यात हलके तेल किंवा बटर टाका आणि पिठात मिक्स करा. 

तुम्हाला हवे असल्यास कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवूनही शिजवू शकता. तुमचा केक 10 मिनिटांत तयार होईल. यानंतर केकवर चॉकलेट लावा आणि काजूने सजवा आणि सर्व्ह करा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

पर्यावरण मूल्यांपासून आपण दूर जातोय का? गोव्यातील निसर्गस्नेही जत्रांचे बदलणारे स्वरुप आणि सावधगिरी

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

Kieron Pollard Record: धोनी, 'हिटमॅन' शर्माचे चाहते नाराज! 'पोलार्ड'ने केला मोठा धमाका; मोठा विक्रम केला नावावर Watch Video

Chimbel Protest: '..आमचो गळो चिरलो'! युनिटी मॉलविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक; आंदोलक बसले उपोषणाला Video

SCROLL FOR NEXT