Brain Tumour In Children Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brain Tumour In Children: लहान मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचा धोका कसा ओळखाल? काय असतात लक्षणे, कशी काळजी घ्याल?

Pediatric Brain Tumor Symptoms: जेव्हा मुलांना वारंवार डोकेदुखी, चिडचिड, डोळे कमजोर होणे किंवा अचानक झटके येऊ लागतात, तेव्हा पालक बहुतेकदा ही एक कॉमन शारीरिक समस्या मानून दुर्लक्ष करतात.

Manish Jadhav

Brain Tumour Symptoms in Children: जेव्हा मुलांना वारंवार डोकेदुखी, चिडचिड, डोळे कमजोर होणे किंवा अचानक झटके येऊ लागतात, तेव्हा पालक बहुतेकदा ही एक कॉमन शारीरिक समस्या मानून दुर्लक्ष करतात. कधीकधी हे थकवा, अभ्यासाचा ताण आणि मोबाईलचा जास्त वापर यामुळे होत असेल असे मानले जाते, परंतु ही लक्षणे ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराकडे निर्देशित करु शकतात. आतापर्यंत ब्रेन ट्यूमर हा मोठ्यांना होणारा आजार मानला जात होता, परंतु आता हा आजार मुलांना देखील होऊ लागला आहे. चला तर मग तज्ञांकडून याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...

ब्रेन ट्यूमर ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढतात, ज्यामुळे ट्यूमर तयार होतो. हे ट्यूमर दोन प्रकारचे असू शकतात.

नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरो आणि स्पाइन सर्जरीचे वरिष्ठ संचालक आणि एचओडी डॉ. राहुल गुप्ता सांगतात, प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलांना (Children) देखील हा आजार होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर हा सर्व वयोगटातील मुलांना होऊ शकतो.

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरची सामान्य लक्षणे

सतत डोकेदुखी: तीव्र डोकेदुखी, विशेषतः सकाळी उठल्यावर, जी काही तासांनी कमी होऊ शकते.

मळमळ आणि उलट्या: कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार उलट्या किंवा मळमळ होते.

डोळ्यांच्या समस्या: अंधुक दृष्टी आणि डोळ्यातून सतत पाणी येते.

मानसिक बदल: चिडचिड, वर्तनातील बदल, गोष्टींमधील रस कमी होतो.

संतुलन आणि चालण्याच्या समस्या: पीडित मुलाला चालण्यास त्रास होतो. चालताना संतुलन राहत नाही.

ओळखण्यास उशीर का होतो?

कधीकधी मुलांमध्ये ट्यूमरची लक्षणे सामान्य आजारांसारखी वाटतात. पालक अनेकदा डोकेदुखीला सामान्य मानतात किंवा जर मूल खूप लहान असेल तर तो त्याची समस्या योग्यरित्या समजावून सांगू शकत नाही. म्हणूनच, जर कोणतेही लक्षणे वारंवार आणि कोणत्याही कारणाशिवाय दिसून येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचा ठरतो.

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचे निदान करण्याची पद्धत कोणती?

डॉ. राहुल गुप्ता यांनी सांगितले की, अल्ट्रासाऊंडमुळे बाळांमध्ये किंवा जन्मापूर्वीही ट्यूमर किंवा हायड्रोसेफलस आढळू शकतो. एमआरआय तपासणीतून मुलाला ब्रेन ट्यूमर आहे की नाही याचचे निदान करता येते. स्कॅनिंगदरम्यान मुलाला 15 ते 20 मिनिटे स्थिर ठेवण्यासाठी बेहोशीचे इंजेक्शन द्यावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत हायड्रोसेफलस किंवा वाढलेल्या इंट्रा-क्रॅनियल प्रेशरची लक्षणे पाहण्यासाठी सीटी स्कॅनचा देखील सल्ला दिला जातो. तसेच, रुग्णाच्या शरीराच्या इतर भागांच्या कार्यांचे मूल्यांकन ब्लड टेस्ट किंवा छातीचा एक्स-रे किंवा पोटाच्या अल्ट्रासाऊंड द्वारे देखील केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT