Goa Miles App Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Miles: गोव्यात कमी खर्चात 24/7 मिळते टॅक्सी सेवा, कुठे आणि कसे कराल बुकिंग?

Shreya Dewalkar

Goa Miles: गोवा माइल्स हा गोवा राज्य सरकारने सुरू केलेल्या अधिकृत टॅक्सी अॅप आहे. हे अॅप पर्यटक आणि स्थानिकांना टॅक्सी सेवा देण्यासाठी सोयीस्कर तसेच योग्य खर्चात सेवा देणारे आहे. गोवा माइल्सचे मुख्य वैशिष्ट्य हे पर्यटक आणि स्थानिकांची होणारी लुट थांबवणे आहे. तुम्ही जर गोव्यात कुठेही फिरण्याचा विचार करत असाल तर या सेवेचा आनंद जरूर घ्या.

अधिकृत टॅक्सी सेवा: गोवा माइल्स हे गोव्यात टॅक्सी बुक करण्यासाठी अधिकृत अॅप आहे. राज्यात टॅक्सी सेवा देण्याचा हेतू आहे.

निश्चित सेवा दर: टॅक्सी सेवांसाठी एक निश्चित सेवा दर करण्यात आलेला आहे. हे भाडे सामान्यतः प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे मोजले जाते.

24/7 सेवा: गोवा माइल्स ही सेवा तुम्हाला 24 तास मिळते.

Goa Miles App

डिजिटल पेमेंट सेवा: अॅपमध्ये अनेकदा डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश असतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या टॅक्सी राइड्ससाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देता येतात.

ड्रायव्हरची ओळख पडताळणी: वापरकर्ते नियुक्त केलेल्या ड्रायव्हरबद्दल त्यांचे नाव आणि संपर्कासंबंधी माहिती जाणून घेऊ शकतात.

सेवा उपलब्धता: अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या परिसरातील उपलब्ध टॅक्सी शोधण्यात आणि बुक करण्यात मदत करते. राज्यात ही सेवा विकसित होत आहे.

https://www.goamiles.com/ या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, तुम्ही टॅक्सी बुक करू शकता किंवा त्यांचे गुगल प्ले स्टोअरला अॅप देखील आहे. या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांचे हेल्पलाईन नंबर देखील आहेत, कोणतीही अडचण अल्यास याठिकाणी तुम्हाला तात्काळ मदत मिळु शकते.

याठिकाणी गोवा माइल्सने दिलेल्या सेवांचे फिडबॅक देखील पाहू शकता. पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या अनेक तक्रारी नंतर टॅक्सी सेवांमध्ये पारदर्शकता तसेच नियम आणि कार्यक्षमता आणण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने (GTDC) पुढाकार घेतला होता.

राज्यात गोवा माइल्स 15 ऑगस्ट 2018 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आली होती. या उपक्रमाला सरकारकडून पाठिंबा मिळाला असून गोवा माइल्सचा वापर अधिक वाढत आहे.

गोवा माइल्स ही FROTAMILES PRIVATE LIMITED नावाच्या स्थानिक गोवन कंपनीद्वारे चालवले जाते, 20 कंपन्यांमधुन एक ही कंपनी निवडली गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT