Black Gram Lentil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Black Gram Lentil Benefits: पुरूषांनी 'ही' डाळ दररोज खावी, अनेक समस्यांवर लाभदायी

प्रतिकारशक्तीत वाढ, लैंगिक समस्या होतील दूर, कोलेस्ट्रॉल घटेल, चेहऱ्यावर येईल चमक

गोमन्तक डिजिटल टीम

Black Gram Lentil Benefits: डाळी आपल्या आहारात फार महत्वाच्या आहेत. शरीराला आवश्यक प्रथिनांची पुर्तता डाळींच्या (Lentil) सेवनातून होते. त्यामुळे डॉक्टरदेखील नेहमीच डाळींचे सेवन करण्याचा सल्ला देतात. एरवी डाळींचा समावेश आहारात असतोच, पण अनेकांना माहिती नसेल की, उडदाची डाळ (Black Gram Lentil) पुरूषांसाठी वरदान (Gift) मानली जाते.

मांसाहार (Non-vegetarian) करणाऱ्यांना आवश्यक पोषणतत्वे मांसाहारातून मिळतात पण शाकाहारी (Vagitarian) लोकांसाठी डाळी हा प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे. डाळी अनेक प्रकारच्या आहेत, उदा- हरभरा, उडीद, मूग, मसूर, मटकी इत्यादी. या प्रत्येक डाळीचे स्वतःचे असे महत्व आहे. मात्र त्यात उडदाची काळी डाळ सर्व डाळींमध्ये अत्यंत शक्तीवर्धक (power booster) आणि पौष्टिक (nutritious) आहे.

अनेकदा लोकांचा असा समज असतो की उडदाची डाळ पचायला जड असते. त्यामुळे अनेकजण या डाळीला नाके मुरडतात. तथापि, ही डाळ पुरूषांसाठी अनेक दृष्ट्या लाभदायी आहे. आपल्या देशात विविध डाळींचे उत्पादन घेतले जाते. त्यात सर्वाधिक उत्पादन उडदाच्या डाळींचेच होते. ही डाळ टरफलाशिवाय तसेच टरफलासहदेखील खाल्ली जाते. अनेक लोक ही डाळ दळूनही खातात. पचनयंत्रणा कमकुवत असणाऱ्यांनी ही डाळ खाऊ नये, असे मानले जाते.

उडदाच्या डाळीचे सेवन करण्याचे फायदे

ही डाळ सीमेन बूस्टर म्हणजेच वीर्यवर्धक असते. स्पर्म काऊंट वाढविण्यासाठी ही डाळ फायदेशीर ठरते. पुरषांच्या हृदयासाठीही ही डाळ फायदेशीर आहे. उडदाची काळी डाळ पाण्यात ६-७ भिजवून ठेवावी. त्यानंतर ती देशी तुपात फ्राय करून मदासोबत खाल्ल्यास पुरूषांमधील ताकद वाढते. त्यामुळे पुरुषांच्या लैंगिक समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी ही डाळ खूप फायदेशीर आहे. याशिवाय पुरषांमध्ये कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठीही ही डाळ लाभदायी ठरते.

महिलांसाठीही लाभदायक

उडदाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात लोह असते, ते शरीरासाठी लाभदायी असते. असे म्हणतात की, उडदाच्या डाळीत रेड मीट पेक्षाही जास्त लोह असते. महिलांसाठीही ही डाळ एखाद्या टॉनिकप्रमाणे असते. ज्या मुली/महिलांना मासिक पाळीत खूप रक्तस्त्राव होतो त्यांनी या डाळीचे सेवन जरूर करावे. या डाळीचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने मुरूमे जातात तसेच चेहऱ्यावर चमक येते. एकप्रकारे उडदाची डाळ स्त्री आणि पुरूषांसाठी अनेक पोषक घटकांचा खजानाच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT