Bicycle Garba: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bicycle Garba: पाहावं ते नवलच! सायकल गरब्याने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, पाहा व्हिडिओ

देशभरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून गुजरातमधील गरब्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Puja Bonkile

Bicycle Garba Video: सध्या संपुर्ण देशात नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. सर्वत्र आनंददायी आणि भक्तीमय माहोल दिसत आहे. अनेक लोक माता दुर्गेची पुजाअर्चा आणि आराधना करण्यात मग्न दिसत आहेत. तसेच या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गरबा खेळायला कोणाला आवडत नाही असे म्हणणारे फारच कमी लोक असतील. असाच एक गरब्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. गुजरातमधील सुरत येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने नवरात्रोत्सवादरम्यान सायकल गरब्याचे आयोजन केले होते. वृत्तसंस्था एएनआयने या सायकल गरब्याचा व्हिडिओ ट्विट करत शेअर केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सायकल चालवत लोक दांडिया खेळण्याचा आनंद घेत आहेत. सर्व लोक एका हाताने हँडल धरून दुसऱ्या हातात दांडिया करत आहेत.

या सायकल गरबा कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळी लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हा व्हिडिओ पाहुन तुम्हीही थक्क व्हाल. सायकल चालवत अप्रतिम आणि मस्त स्टाअलमध्ये दाडिंया करताना दिसत आहे. प्रत्येकजण त्यांच्या बॅलन्स सांभाळत असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

गुजरातचा गरबा केवळ भारतातच नाही तर जगभरात देखील प्रसिद्ध आहे. गरबा नवरात्रीचा आनंद अधिक द्विगुणित करतो.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सहाय फाउंडेशनने आयोजित केलेल्या 'केसरिया गरबा' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 'युवा मंडळ स्ट्रीट गरबा' कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनीही सहभाग घेतला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT