Zodiac Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bhaubeej 2023: राशीनुसार तुमच्या भावाला लावा टिळा, लाभेल दीर्घायुष्य

भाऊबीजला भावाला राशीनुसार टिळा लावल्यास भावाला दीर्घायुष्य लाभेल.

Puja Bonkile

भाईबीज म्हणजे अतूट स्नेह, पवित्र नाते आणि विश्वास यांचे प्रतिक असलेला सण होय. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी ओवाळतात आणि टिळा लावतात. पण राशीनुसार तुमच्या भावाला टिळा लावल्यास दीर्गायुष्य लाभेल.

भाऊबीजचा शुभ मुहूर्त

यावेळी भाऊबीजचा शुभ मुहूर्त सकाळी 10.30 ते दुपारी 12 पर्यंत आहे. त्यानंतर संध्याकाळी 5:15 ते 6:15 पर्यंत असणार आहे. मधल्या काळात भाऊ-बहिणीचा हा सण साजरा केला तर उत्तम मानले जाणार आहे.

राशीनुसार भावाला टिळा लावा

मेष

 जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर त्याला कुंकू लावा.

वृषभ

तुमच्या भावाची राशी वृषभ असेल तर भगव्या रंगात थोडी हळद मिसळून टिळा लावा.

मिथुन

तुमच्या भावाची राशी मिथुन असेल तर लाल सिंदूर लावून टिळा लावा.

कर्क

 तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर भगव्या रंगात थोडी हळद मिसळून टिळा लावा.

सिंह

तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल तर कुंकू लावा.

कन्या

 जर तुमच्या भावाची राशी कन्या असेल तर लाल सिंदूर लावून टिळा लावा.

तूळ

जर तुमच्या भावाची राशी तूळ असेल तर भगव्या रंगात थोडी हळद मिसळून टिळा लावा.

वृश्चिक

 जर तुमचा भाऊ वृश्चिक राशीचा असेल तर केशराचा टिळा लावा.

धनु

तुमच्या भावाची राशी धनु असेल तर हळदीचा टिळा लावा.

मकर

भावाची राशी मकर असेल तर लाल रोळीत चंदन मिसळून टिळा लावावा.

कुंभ

तुमच्या भावाची राशी कुंभ असेल तर लाल रोळीत चंदन मिसळून टिळा लावा.

मीन 

जर तुमच्या भावाची राशी मीन असेल तर त्याला हळदीचा टिळा लावा.

भाऊ दूज पूजा विधी

योग्य दिशेने बसूनच टिळा लावावा. बहिणींनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि भावांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे.

या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हिरवा रुमाल किंवा कापड खरेदी करावे.

त्यात तीन मूठभर हिरवे अख्खे मूग, एक वेलची, एक लवंग, पाच गोमती चक्र आणि काही दुर्वा टाकून त्यात तीन गाठी बांधून आपल्या भावावर सात वेळा फेकून द्या.

चुकूनही बहीण किंवा भावाने आज काळे कपडे घालू नयेत.

भावाला टिळा लावण्यापूर्वी बहिणींनी अन्न खाऊ नये. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT