Online Friendship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Online Friendship: डिजिटल जाळ्यात अडकू नका, ऑनलाइन मित्र निवडताना घ्या खबरदारी!

Online Friendship Safety: सध्याच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि ऑनलाइन चॅटिंग ॲप्समुळे नवीन मित्र जोडणे अतिशय सोपं झालं आहे.

Sameer Amunekar

सध्याच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि ऑनलाइन चॅटिंग ॲप्समुळे नवीन मित्र जोडणे अतिशय सोपं झालं आहे. मात्र, ऑनलाइन मैत्री करताना सावधगिरी बाळगली नाही, तर ती महागात पडू शकते. अनेक सायबर गुन्हेगार सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करत असतात.

बऱ्याचदा अनोळखी व्यक्ती मैत्रीच्या बहाण्याने जवळ येतात आणि नंतर पैशाची मागणी करतात. विशेषतः डेटिंग ॲप किंवा सोशल मीडियावर सुरू झालेल्या संवादातून आर्थिक फसवणूक होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

काही लोक बनावट प्रोफाइल तयार करून मैत्री करताना आपली गुप्त माहिती जाणून घेतात. नंतर ते या माहितीकडून ब्लॅकमेलिंग किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

काही वेळा ऑनलाइन मैत्रीमध्ये भावनिक गुंतवणूक होते. जर समोरच्या व्यक्तीचा हेतू चुकीचा असेल, तर तो व्यक्ती भावनांचा गैरफायदा घेऊन मोठी फसवणूक करू शकतो.

अनेक वेळा लोक लांबूनच ऑनलाइन संबंध ठेवतात आणि समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतात. मात्र, काही वेळा हे लोक फसवणूक करणारे असतात, जे भावनिक आणि आर्थिक शोषण करतात.

सावधगिरी कशी बाळगावी?

कोणत्याही नवीन व्यक्तीशी मैत्री करताना त्याचे प्रोफाइल नीट तपासा. जर प्रोफाइलवरील माहिती कमी असेल किंवा फोटो बनावट वाटत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.

फोन नंबर, बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा कोणतीही खासगी माहिती शेअर करण्यास टाळा.जर समोरची व्यक्ती सतत व्हिडीओ कॉल टाळत असेल, तर तो संशयास्पद असू शकतो.

फसवणुकीच्या घटनांबाबत जागरूक रहा

नेहमी सायबर गुन्हेगारीच्या नव्या पद्धतींबाबत माहिती ठेवा आणि कोणतीही संशयास्पद बाब दिसल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा.

ऑनलाइन मैत्री करणे काही चुकीचे नाही, पण ती करताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नका आणि कोणतीही आर्थिक देवाणघेवाण टाळा. सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहणे आणि वेळोवेळी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT