Toxic Relationship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Toxic लोकांबरोबर वागण्याची योग्य पद्धत कोणती?

अशा लोकांपासून स्वत:ला कसे दूर ठेवायचे किंवा त्यांच्याशी कसे वागायचे हे अनेकांना समजत नाही.

दैनिक गोमन्तक

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात, ज्यांच्याबरोबर रोजच्या जीवनात तुम्हाला वेळ घालवायचा असतो, काहीवेळा व्यवहार करायचा असतो आणि अनेकदा कामानिमित्त रोज त्यांच्याशी संपर्क येत असतो. या सर्वांचा कळत-नकळत आपल्या आयुष्यावर परिणाम होतो.

चांगल्या स्वभाव असलेली, आशादायक, आपल्याला पुढे जाण्यात मदत करणारे, सकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला असले की आपण आपले काम अधिक नीट, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि आनंदाने करतो.

मात्र काहीवेळा नकारात्मक, सतत चूका काढणारे, भांडणाला प्रोत्साहन देणारे लोक असतील तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा अशा लोकांपासून स्वत:ला कसे दूर ठेवायचे किंवा त्यांच्याशी कसे वागायचे हे अनेकांना समजत नाही. चला तर जाणून घेऊयात अशा टॉक्सिक लोकांना कशा प्रकारची वागणूक दिली पाहिजे.

  • रागावर नियंत्रण ठेवा

एखाद्या व्यक्तीच्या चूकीच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल तरी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जरी ती व्यक्ती चुकीची असली तरीही तुम्ही त्याच्याशी शांतपणे आणि आदराने बोलले पाहिजे. जर त्याने तुम्हाला उसकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही भांडणासाठी नाही तर बोलण्यासाठी एकत्र बसला आहात.

  • त्यांचीही बाजू समजून घ्या

कधीकधी व्यक्तीच्या चुकीच्या शब्दांना किंवा वागण्याला त्याची परिस्थितीही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीलाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीसोबतच्या तुमच्या नात्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो त्याच्या बचावात किती सत्य आणि किती खोटं बोलतो याकडे लक्ष द्या.

  • थेट बोला

टॉक्सिक लोकांना त्यांच्या शब्दांचा किंवा वागण्याचा इतरांवर कसा परिणाम होतो हे सहसा लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्याशी थेट बोलणे गरजेचे आहे. त्यांचे बोलणे किंवा वागणे तुम्हाला कसे वाटते ते त्यांना सांगा. जर त्यांना तुमची खरोखर काळजी असेल तर ते त्यांचे शब्द किंवा वागणूक सुधारण्याचा प्रयत्न करतील.

  • दूर राहा

असे लोक ज्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. मनावर ताण होत असेल तर आणि असे लोक तुमच्या आयुष्यात जास्त महत्वाचे नसतील तर अशा लोकांपासून दूर राहा. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर आणि स्वत:वर लक्ष केंद्रीत करु शकाल.

  • स्वत:वर विश्वास ठेवा

तुम्ही जेव्हा घराबाहेर पडता तेव्हा अनेकप्रकारचे लोक तुम्हाला भेटणार असतात, त्यामुळे तुम्ही स्वत:वर विश्वास ठेऊन इतरांबरोबर व्यवहार करणे गरजेचे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT