Skin Care: तेजस्वी त्वचा सर्वांना हवी असते. मात्र बदलती जीवनशैली, असंतुलीत आहार, व्यायामाचा अभाव, कमी झोप, नको तितका ताणतणाव, वाढते वय आणि वाढते प्रदुषण यामुळे त्वचा निस्तेज होऊ लागते.
यामुळे अनेकजण त्रस्त असतात आणि आपली त्वचा चांगली व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत, त्वचा निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या व्हिटॅमिन्सचा समावेश असायला हवा.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर तुम्ही संत्री, लिंबू यासारखी फळे खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
व्हिटॅमिन ई
जर हिवाळ्यात तुमच्या त्वचेची चमक कमी झाली असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन ई चा समावेश करु शकता. कारण म्हणजे व्हिटॅमिन ईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. याबरोबरच व्हिटॅमिन ई शेंगदाणे, मोहरी आणि ब्रोकोलीमध्येदेखील आढळते. यामुळे त्वचेची जळजळ आणि कोरडेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो. त्याचबरोबर तुमची त्वचा देखील चमकदार होते.
व्हिटॅमिन के
व्हिटॅमिन के चा वापर त्वचेची चमक वाढवण्यासाठी केला जातो. याचे सेवन केल्याने त्वचेची चमक तर वाढतेच पण व्हिटॅमिन्समुळे पिगमेंटेशनची समस्याही दूर होते. याचे सेवन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोबी, ब्रोकोली, धणे आणि दलिया यांचा समावेश करावा. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
या सगळ्याबरोबरच तुम्ही तुमच्या आहारात रताळे, टोमॅटो, ब्लूबेरी, ब्राऊन राइस, पालक, हिरव्या पालेभाज्या, गाजर, अॅप्रिकोट यासारख्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला तर तुमच्या त्वचेबरोबरच तुमचे आरोग्यदेखील उत्तम राहण्यास मदत होईल.
आहाराबरोबरच, त्वचेची वेळोवेळी काळजी घेणेदेखील गरजेचे असते. जसे की उन्हात जाताना आणि उन्हातून आल्यानंतर योग्य उपाय केले पाहिजेत. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते त्यावेळी आपल्या डॉक्टरांच्या अथवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार क्रीम अथवा इतर गोष्टींचा आपल्या त्वचेच्या निरोगीपणासाठी वापर केला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.