Best Tourist Places For Christmas
Best Tourist Places For Christmas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Best Tourist Places For Christmas: गोव्यासह 'या' 3 ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा लुटा आनंद

Puja Bonkile

Best Tourist Places For Christmas: दरवर्षी ख्रिसमस २५ डिंसेबरला साजरा केला जातो. यंदा २५ डिंसेबरला सोमवार आला आहे. यामुळे तुम्ही मोठ्या वीकेंडचा आनंद लुटू शकता. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक लोक ट्रिप प्लॅन करतात. तुम्हीही ख्रिसमसच्या निमित्ताने कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर गोव्यासह काही खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

  • गोवा

देशभरात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी गोवा एक आहे. गोवा खाद्यसंस्कृती, समुद्रकिनारे, लोकनृत्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याला भेट देणे अनेक लोकांचे इच्छा असते. यंदा ख्रिसमसला तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर गोव्याला नक्की भेट देऊ शकता. तुम्ही कुटुंबासह गोव्यात या ख्रिसमस संस्मरणीय बनवू शकता.

गोव्यात ख्रिसमस मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. गोव्यात विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. ते इतर ठिकाणी सहसा दिसत नाही. त्यात दूध नारळ अंडी यांचा वेगवेगळ्याप्रकारे वापर केला जातो. जगातील अतिभव्य शानदार महत्वाची अशी चर्चेस गोव्यात जुन्या काबीजातीमध्ये (old Conquest) आहेत. यातील काही आशिया खंडात मोठी आहेत तर काही पोतुर्गालमधील चर्चपेक्षाही भव्य व सुंदर आहेत. ख्रिसमस दरम्यान गोव्यातील चर्च नव्या नवरीसारखे सजवले जातात. गोव्याला तुम्ही सहज पोहोचु शकता. पण लाँग वीकेंड आणि ख्रिसमसमुळे देश-विदेशातील पर्यटकांची तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळेल.

  • शिमला

जर तुम्ही हिल स्टेशनवर ख्रिसमस साजरा करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शिमलाला जाऊ शकता. कडाक्याच्या थंडीत एका वेगळ्याच आल्हादासह आणि प्रसन्नतेने साजरा करु शकता. तुम्ही येथे हिमवर्षावचा देखील आनंद लुटू शकता. तुम्ही तुमच्या कारने शिमल्याला सहज पोहोचू शकता. पण लाँग वीकेंड आणि ख्रिसमसमुळे तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळेल.

  • उदयपूर

राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ उदयपूर येथे जाऊन तुम्ही तुमचा ख्रिसमस साजरा करू शकता. उदयपूर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही इथे कोणत्याही मार्गाने सहज पोहोचू शकता. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह येथे ख्रिसमस सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. उदयपूरमध्ये तुम्हाला भेट देण्यासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणे पाहायला मिळतील. तसेच येथील हवामान तुम्हाला खुप आवडेल.

  • नैनिताल

ख्रिसमस सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी उत्तराखंडमधील प्रसिद्ध हिल स्टेशन नैनितालला देखील भेट देऊ शकता. ख्रिसमसच्या वेळी नैनितालमधील हवामान खूप थंड असेल आणि तुम्हाला हिमवर्षावचा अनुभव घेता येईल. तुम्हाला येथे भेट देण्यासाठी अनेक उत्तम पर्याय मिळतील. येण्यापूर्वी हॉटेल बुकींग करून घ्यावी. कारण वीकेंड आणि ख्रिसमसमुळे नैनितालमध्ये तुम्हाला खूप गर्दी दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT