Adventure Trip |zipline  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: गोव्यासह भारतातील 'या' ठिकाणी झिपलाइनचा लूटा आनंद

अनेक लोकांना अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करायला आवडतात. तुम्हाला झिपलाइनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही गोव्यासह भारतातील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

Puja Bonkile

Travel Tips: प्रवासाची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा काहीतरी खूप रोमांचक आणि संस्मरणीय केले जाते. कदाचित यामुळेच बहुतेक लोकांना सुट्टीच्या दिवशी अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करायला आवडतात. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल ज्यांना स्वतःच्या डोळ्यांनी सुंदर दृश्ये पाहणे आवडते, तर तुम्ही झिपलाइनिंगचा आनंद घेऊ शकता.

झिपलाइनिंग ही अशीच एक अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी आहे. यामध्ये झिपच्या मदतीने काही विलोभनीय दृश्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता. कधीकधी ते तुम्हाला घाबरवते, परंतु तरीही तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्हीही या सुट्टीत झिपलाइन करण्याचे ठरवले असेल, तर तुम्ही गोव्यासह भारतातील काही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

  • गोवा

देश-विदेशातील पर्यटकांसाठी गोवा आवडीचे ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे,खाद्यसंस्कृती, सण-उत्सव आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी पर्यटकांना आकर्षित करतात. पण हे ठिकाण भारतातील सर्वोत्तम झिपलाइन ठिकाणांमध्ये गणले जाते. गोव्यातील झिपलाइन स्काय-राइड धारबांदोडा गावात आहे. आता जेव्हाही तुम्ही गोव्याला भेट द्याल तेव्हा तुमची सुट्टीचा आनंद द्विगुणित करू शकता.

  • मुन्नार

मुन्नार हे एक उत्तम क्षेत्र आहे जिथे लोक सहसा भेट देण्याचा प्लॅन करतात. 1800 मीटर लांबीची ही भारतातील सर्वात लांब झिपलाइनपैकी एक आहे. मुन्नार हा चहाचे मळे असलेला डोंगराळ भाग आहे. त्यामुळे येथे झिपलाइन करताना तुम्ही स्वतःला नवसंजीवनी देऊ शकता. मुन्नारमधील झिपलाइन टेंट कॅम्प पोथामेडूजवळ आहे आणि अनाचलपासून सुमारे 13 किमी अंतरावर आहे.

  • मसुरी

उत्तराखंडमध्ये भेट देण्यासाठी मसुरी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही अनेक प्रकारच्या अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. ही झिपलाइन समुद्रसपाटीपासून 600 फूट उंचीवर अतिशय सुंदर आहे. आपल्या देशातील ही पहिली वन्यजीव झिपलाइन आहे. जी तुम्हाला घनदाट दऱ्या आणि पाइन जंगलांच्या हवाई सहलीवर घेऊन जाईल. मसुरीमधील झिपलाइन बेस क्लाउड्स एंड इस्टेटमधील मसूरी अॅडव्हेंचर पार्कमध्ये आहे.

  • ऋषिकेश

ऋषिकेश हे आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु जेव्हा तुम्ही येथे असता तेव्हा तुम्ही काही उत्कृष्ट अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग आणि रॅपलिंग सारख्या उत्कृष्ट अॅक्टिव्हिटी करू शकता. एवढेच नाही तर येथे झिपलाइनचाही आनंद लुटता येईल. ऋषिकेशमध्ये तुम्ही 500 मीटर लांब झिपलाइन अनुभवू शकता.

  • मनाली

अनेक लोक थंडीच्या दिवसात मनालीला जाण्याचा प्लॅन करतात. हे ठिकाण जितके सुंदर आहे तितकेच अनेक साहसी उपक्रमांचा इथे आनंद लुटता येतो. 6000 फूट उंचीवर 525 किमी लांबीची भारतातील सर्वात लांब झिपलाइन आहे. झिपलाइन करताना तुम्ही वरून सर्वोत्तम दृश्ये पाहू शकता. मनालीमध्ये लोकांना पॅराग्लायडिंग, स्कीइंग, ट्रेकिंग इत्यादी अनेक अॅक्टिव्हिटी करायला आवडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT