Beetroot Pickle Daiik Gomantak
लाइफस्टाइल

Beetroot Pickle: तुम्हीही हिवाळ्यात बीटपासून बनवलेल्या लोणच्याचा घेऊ शकता आस्वाद, नोट करा रेसिपी

कैरी किंवा मिरचीचे लोणचे तुम्ही एकदा नाही तर हजारो वेळा चाखले असेल, पण हिवाळ्यात बीटरूटचे लोणचे खाल्ल्यानंतर जेवणाची चव चौपट वाढते.

Puja Bonkile

Beetroot Pickle: तुमच्या घरात आणि माझ्या घरात जेवणासोबत लोणचे मोठ्या आवडीत खाल्ले जाते. जेवण चांगले बनवलेले असो वा खराब, लोणच्याचा आहारात समावेश केला तर जेवणाची चव द्विगुणित होते. भारतीय घरांमध्ये पराठा किंवा साध्या जेवणासोबत चविष्ट लोणचे देण्याची प्रथा मानली जाते. हिवाळ्यात जेवणासोबत लोणचे खाणे अनेकांना आवडते. अनेकांना कैरीचे लोणचे तर काहींना मिरचीचे लोणचे आवडते. हिवाळ्यात तुम्ही बीट एकदा नाही तर अनेक वेळा खात असाल. तुम्ही बीटपासून लोंच देखील तयार करू शकता. हे बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घऊया रेसिपी.

बीट लोंच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बीट - 500 ग्रॅम

लसूण पाकळ्या - 5-6

कढीपत्ता - 5

आले - 1/2 तुकडे

हिरवी मिरची - 4 बारीक चिरून

हळद - 1/2 टीस्पून

लाल-काश्मिरी पावडर - 1/2 टीस्पून

मेथी दाणे - 1/2 टीस्पून

व्हिनेगर - 1 चमचा

हिंग - 1/2 टीस्पून

आमचुर पावडर - 2 चमचे

मोहरीचे तेल - 1/2 कप

आचारी मसाला - 2 चमचे

मोहरी - 2 चमचे

चवीनुसार मीठ

बीट लोंण बनवण्याची कृती

बीटचे लोंणचे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी सर्वात पहिले बीट सोलून त्याचे छोटे तुकडे करावे.

तुमच्या गरजेनुसार बीट कापल्यानंतर किमान 1 दिवस उन्हात ठेवावे. ऊन नसल्यास बीट 2-3 दिवस सुकविण्यासाठी ठेवावे. यामुळे लोणच्याची टेस्ट योग्य होईल.

कढईत मोहरीचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, लसूण, आले, मिरची, कढीपत्ता, हळद-तिखट घालून 10-15 मिनिटे चांगले परतून घ्या.

15 मिनिटानंतर सर्व बीटचे तुकडे पॅनमध्ये टाकावे आणि सुमारे 10 मिनिटे चांगले तळून घ्या. यानंतर पॅनमध्ये मीठ, आमचुर वापडर, लोंणच मसाला, मेथीदाण्याची पूड घालून चांगले मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा.

दुसर्‍या पॅनमध्ये 1/2 कप मोहरीचे तेल घालून गरम करा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे.

यानंतर, बीट व्यवस्थित तळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थोडा वेळ थंड झाल्यावर लोंणचे हवा बंद भरणीत टाका. आता त्यात गरम केलेले तेल घालून चांगले मिसळा आणि थोडा वेळ उन्हात ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT