5 Minutes Beauty Routine Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: स्वत:साठी वेळ नाहीय, मग फॉलो करा 5 मिनिटांचा हा ब्युटी रूटीन

5 Minutes Beauty Routine Tips: घर आणि ऑफिसच्या कामांमुळे महिलांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. यामुळे चेहरा निस्तेज दिसतो.

Puja Bonkile

5 Minutes Beauty Routine Tips: घरातील आणि ऑफिसमधील कामांमुळे महिला आरोग्याकडे आणि त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाही. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास महिलांची त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात. तुम्ही फक्त 5 मिनिटांचा हा ब्युटी रूटीन फॉलो करू शकता.

घरात राहणाऱ्या महिलांपेक्षा नोकरी करणाऱ्या महिलांना प्रदूषण आणि धुळीचा जास्त सामना करावा लागतो. अशावेळी तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी थोडा वेळ स्वत:साठी काढणं खूप महत्वाचे आहे. दररोज फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.

  • क्लींजिंग करा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी त्वेचाला क्लींजिंग करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही दिवसभर प्रदूषण आणि धुळीच्या संपर्कात राहता, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा क्लींजिंग करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून मेकअपसोबत घाम आणि ऑइलीपणा तुमच्या त्वचेतून निघून जाईल.

  • वॉश, टोन करा आणि मॉइश्चरायझ करा

उन्हाळ्यात तुळस आणि कडुलिंबाचे पान असलेल्या फेसवॉशचा वापर करावा. यामुळे त्वचेतील घाण कमी होते आणि त्वचा मुलायम आणि कोमल बनते. चेहरा धुतल्यानंतर त्वचेला टोनल लावावे. यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता.

यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल तेसच त्वचेची छिद्रेही बंद होतात. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा चमकदार दिसतो. यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. उन्हाळ्यात, मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन देखील लावावे.

  • स्क्रब

आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहरा स्क्रबने स्वच्छ करावे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघुण जातात. तसेच त्वचा आतून स्वच्छ होते. त्यामुळे त्वचा चमकदार दिसते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आठवड्यातून एकदा स्क्रब करावे.

  • मेकअप रिफ्रेश करण्यासाठी

अनेकदा नोकरी करणाऱ्या महिला सकाळी मेकअप करतात. दिवसभर काम केल्यानंतर चेहऱ्यावरचा मेकअपही नाहीसा होतो. पुन्हा फ्रेश दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या बॅगेत काही गोष्टी ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या पर्समध्ये फेस कॉम्पॅक्ट पावडर ठेवावे. यामुळे उन्हाळ्यात तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT