Beauty Expert Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Expert Tips: हातावरील सुरकुत्या होतील कमी फक्त फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Hands Care Tips: जर तुमच्याही हातावर सुरकुत्या पडत असतील तर पुढील सिंपल टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Beauty Expert Tips easy beauty tips for wrinkle free hands

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. सुरुवातीला हे बदल फक्त सुरकुत्याच्या स्वरूपात दिसतात. या सुरकुत्या केवळ चेहऱ्यावरच नाही तर हातावरही दिसतात. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेकडे जितके लक्ष देतो तितके आपल्या हातांकडे देत नाही. यामुळे हातांची त्वचा सैल होऊन आकुंचन पावते आणि सुरकुत्या दिसू लागतात. 

यामुळे हाताच्या सौंदर्यावर परिणाम होतो. तुम्हाला बाजारात अनेक हँड क्रीम्स आणि उत्पादने मिळतील, जी हाताच्या काळजीसाठी खूप चांगली आहेत. परंतु ही उत्पादने, महाग असण्याव्यतिरिक्त, फार प्रभावी नसतात. जोपर्यंत तुम्ही त्यांचा वापर कराल, तोपर्यंत तुम्हाला फायदा होईल, तुम्ही त्यांचा वापर बंद केला की तुमच्या हातांची स्थिती पूर्वीसारखी होऊ लागेल.  त्यामुळे काही घरगुती उपाय करून हातांची योग्य काळजी घेऊ शकता.

  • हातावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती टिप्स 

एका भांड्यात मध आणि कोरफड जेल मिक्स करा आणि हाताला लावा. हातांना मसाज करताना हे मिश्रण लावावे. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हात धुवा. असे केल्याने तुमच्या हातांची त्वचा मऊ होईल. 

गरम पाण्यात 1 चमचे मीठ घाला आणि त्यात 10 मिनिटे हात बुडवा. यानंतर, आपले हात पाण्यामधून बाहेर काढा. ते टॉवेलने पुसून टाका आणि खोबरेल तेलाने हलके मसाज करा. दररोज असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. 

दुधात गुलाबजल मिक्स करा आणि या मिश्रणाने हातांची मालिश करा. 10 मिनिटे हातावर राहू द्या आणि नंतर धुवा. हा घरगुती उपाय रोज वापरल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. 

नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि नंतर या मिश्रणाने हातांची मालिश करा. 10 ते 15 मिनिटे हातावर राहू द्या आणि नंतर हात धुवावे. असे केल्याने हातावरील सुरकुत्याही कमी होतील. 

दह्यात बेसन आणि मध मिक्स करून हात चोळावे. 2 ते 5 मिनिटे हात स्क्रब करावे. असे केल्याने हातावरील मृत त्वचेचा थर दूर होतो. अनेक वेळा मृत त्वचेमुळे हातावर सुरकुत्या दिसतात. 

गुलाब पाण्यात कॉफी मिक्स करा आणि हाताने स्क्रब करा. कॉफीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात आणि हाताने स्क्रब केल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमक येते. 

दुधाच्या क्रीममध्ये ओट्स पावडर घाला आणि हाताने स्क्रब करा. 10 मिनिटे हातावर राहू द्या आणि नंतर काढून टाका आणि पाण्याने हात धुवा. 

जर तुमच्या हाताची त्वचा कोरडी असेल तर दिवसातून 3 ते 4 वेळा हातावर गुलाबपाणी लावा. यामुळे तुमच्या हाताला कोरडेपणाची समस्या राहणार नाही. 

हातांवर केळीचा मास्क लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी हात धुवा. असे केल्याने तुमच्या हातांची त्वचा घट्ट होईल आणि कोरडेपणाही दूर होईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Speech: 'ज्ञानेशकुमारांचा तुरुंगवास अटळ'! राहुल गांधींचा हल्लाबोल, मतांच्या चोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

SCROLL FOR NEXT