Beard Hygiene Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beard Hygiene: बियर्ड लूक ठेवणार्‍यांनो सावधान! दाढीत लपलेत आजार, टॉयलेट सीटइतकेच चेहऱ्यावरही असतात बॅक्टेरिया; संशोधनातून खुलासा

Beard Bacteria Health Risk: तुमच्या लूकला चार चांद लावणारी दाढी बॅक्टेरियांचे घर बनते, ज्याकडे बहुतेक जण पुरुष लक्ष देत नाहीत, अशा प्रकारे तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत रोगांना आमंत्रण देता.

Manish Jadhav

दाढीवाला रफ-टफ लूक पुरुषांमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहे. एकेकाळी, क्लीन-शेव्हन चॉकलेट बॉय लूक खूप लोकप्रिय होता, परंतु आता बहुतेक पुरुष दाढी वाढवत आहेत. डॅशिंग दिसण्यासाठी लोक त्यांची दाढी वेगवेगळ्या प्रकारे सेट करत आहेत. परंतु दाढीची देखभाल करण्यासोबतच तिची स्वच्छता देखील खूप महत्वाची आहे. जेव्हा तुमची दाढी तुमच्या आरोग्यासाठी घातक बनते तेव्हा काय होते याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का? हे आम्ही तुम्हाला सांगत नसून यासंबंधी एक संशोधन समोर आले आहे.

तुमच्या लूकला चार चांद लावणारी दाढी बॅक्टेरियांचे (Bacteria) घर बनते, ज्याकडे बहुतेक पुरुष लक्ष देत नाहीत, अशा प्रकारे तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत रोगांना आमंत्रण देता. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना दाढी ठेवायला आवडते, तर बॅक्टेरिया तुम्हाला कसे आजारी पाडू शकतात आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेतले पाहिजे.

बाहेर जाणे, धूळ आणि प्रदूषणात राहणे अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे त्वचेवर घाण साचते, ज्यामुळे बॅक्टेरिया देखील वाढतात, म्हणूनच दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो, परंतु असे असूनही तुमची दाढी बॅक्टेरियाचे घर बनू शकते आणि तुम्हाला आजारी पाडू शकते. चला तर मग संशोधन काय सांगते आणि तुम्ही या बॅक्टेरियापासून कसे वाचू शकता याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

दाढीतील बॅक्टेरिया टॉयलेट सीटइतकेच

न्यू यॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिन स्कूलमधील प्राध्यापक डॉ. शारी लिपनर सांगतात, त्वचेवर बॅक्टेरिया असणे सामान्य आहे. दाढीमध्येही बॅक्टेरिया वाढतात, परंतु जर यासंबंधी काळजी घेतली नाहीतर चिंता वाढू शकते. गेल्या वर्षी केलेल्या एका अभ्यासादरम्यान, 18 ते 86 वयोगटातील पुरुषांच्या दाढीचे नमुने घेण्यात आले. असे आढळून आले की, काही पुरुषांच्या दाढीमध्ये टॉयलेट सीटइतके बॅक्टेरिया आढळून आले.

'या' लोकांना जास्त धोका

याबद्दल जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्राध्यापक किम्बर्ली डेव्हिस सांगतात, रुग्णालयात काम करणाऱ्या लोकांच्या दाढीमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. या अभ्यासातून असे दिसून आले की, मास्क घालूनही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दाढीमध्ये जास्त बॅक्टेरिया आढळून आले, त्यामुळे मास्कला वारंवार हात लावू नये.

दाढीमध्ये इतके बॅक्टेरिया का असतात?

युरोपियन जर्नल ऑफ रेडिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या स्विस प्राध्यापक अँड्रियास गॅझगिट यांच्या अभ्यासानुसार, मानवी दाढीमध्ये कुत्र्याच्या फरपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात. खरंतर, दाढी आणि मिशांचे केस खूप जाड असण्यासोबत कुरळे असतात, त्यामुळे बॅक्टेरिया सहज वाढतात.

प्रतिबंधात्मक उपाय

जर तुम्ही दाढी आणि मिशा जाड ठेवत असाल तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. उन्हाळ्यात, बॅक्टेरियाची शक्यता आणखी वाढते, म्हणून घाम आल्यानंतर तो लगेच पूसा. जर तुम्ही तेलकट किंवा मसालेदार अन्न खाल्ले असेल किंवा व्यायाम केला असेल तर त्यानंतर तुमचे शेव्ह स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. यासाठी फेस क्लींजर वापरा. त्याचवेळी, जर चेहऱ्यावर मुरुमांचा घाव असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. दाढी आणि मिशांना वारंवार हात लावणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT