Tampons चा वापर करतांना 'अशी' घ्या काळजी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tampons चा वापर करतांना 'अशी' घ्या काळजी

पॅड वापरून तुम्ही अवघड काम करू शकत नाही ते काम तुम्ही टॅम्पोन्स वापरून सहजपणे करू शकता. जसे धावणे, घोडेस्वारी, पोहणे इत्यादी कामे करू शकता.

दैनिक गोमन्तक

आजच्या जगातील स्त्री ही प्रत्येक गोष्टीत पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात आज मुली धडाडीने काम करतांना दिसतात. अगदी अंतराळ, सैन्यदल, पोलीस दल यासारख्या क्षेत्रात महिला त्यांची कामगिरी चोख बजावत आहेत. कोणत्याही क्षेत्रात आपली कर्तबगारी बजवणारी महिला ही अनेक भूमिकेतून जात असते. ती एक गृहिणी, आई, आणि पत्नी म्हणून एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. या सोबतच मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. तसेच ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. या काळात महिलांना अनेक वेदनांना आणि समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक महिलांना मूड स्विंग, पोटात दुखणे, अंग दुखणे, कंबर दुखणे, अशक्तपणा, यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासोबतच पॅड बदलण्याच्या वेळा पाळाव्या लागतात, वेळेवर पॅड नाही बदले तर इन्फेक्शन आणि ओव्हर ब्लडिंगच्या समस्या असल्यास, कामाच्या ठिकाणी या वेळा पाळणे कठीण होऊन बसते. म्हणूनच आजकाल अनेक महिला टेम्पोन्स आणि कप (Menstrual Cup) चा वापर करतात. पण याचा वापर करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे का? हे जाणून घेवूया सविस्तरपणे

टॅम्पन्स म्हणजे नक्की काय?

टॅम्पोन म्हणजे एक कापसाचा छोटा गोळा . जो ओलसरपणा शोषून घेण्याचे काम करतो. तुम्हाला ते आत (vagina) मध्ये घालावे लागते. त्यानंतर ते रक्त शोषण्यासाठी विस्तारते (उघडते), याला जोडूनच एक छोटा धागा असतो. जो (vagina) बाहेर राहतो, त्यामुळे तुम्ही सहजपणे टॅम्पॉन बाहेर काढू शकता. टॅम्पोन्स जास्त किंवा हलक्या प्रवाहासाठी वेगवेगळ्या शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये येतात. तुम्ही तुमच्या सोयीने टॅम्पॉन निवडू शकता. टॅम्पोन्सला आपण आपल्यासोबत ठेवू शकतो. टेम्पोन्स आपल्याला हव्या त्या आकारात मिळतात. आपण ते केमिस्ट आणि जनरल स्टोअरमधून खरेदी करू शकता.

टॅम्पोन्सचे फायदे

* टॅम्पोन्स आकारात खूप लहान असते. आपण ते सहजपणे आपल्या खिशात घेऊन जाऊ शकता आणि वापरू शकता. याचा वापर केल्याने आपल्याला ओलसरपणा कमी जाणवतो.

* पॅड वापरून तुम्ही ज्या गोष्टी करू शकत नाही त्या गोष्टी टॅम्पोन्स वापरून सहजपणे करू शकता. जसे धावणे, घोडेस्वारी, पोहणे इत्यादी गोष्टी करू शकता.

* टेम्पोन्स वापरण्यास सोईस्कर आहे.

टॅम्पोन्सचे दुष्परिणाम

* टेम्पोन्स आत असल्याचे जाणवत नाही, पण कधीकधी याचे नुकसान देखील होते. स्त्रिया बऱ्याचदा ते बदलणे विसरतात, यामुळे संसर्ग होऊ शकतो. टेम्पोन्स आठ तासापेक्षा अधिक वापरू नये.

* टॅम्पोन्सच्या वापरामुळे सिंड्रोमसारखा धोकादायक संसर्ग होऊ शकतो.

* जरी सामान्य आकाराचे टॅम्पॉन वापरासाठी योग्य असले तरी , काही स्त्रियांना अधिक रक्तस्त्राव होत असल्यास असलेल्यांसाठी योग्य नाहीत. कारण कधीकधी त्यांचा आकार अयोग्य असतो.

* टेम्पोन्सची शोषण्याची क्षमता अधिक असल्याने ते आपल्या शरीरातील पोषक घटकसुद्धा शोषून घेते यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

* टॅम्पन्स योनीमध्ये घालणे थोडे कठीण आहे. यामुळे अनेक महिला याचा वापर करणे टाळतात. जर चुकीच्या पद्धतीने याचा वापर केल्यास आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT