Bad Habits Of Children Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bad Habits Of Children: 'या' टिप्स वापरून मुलांच्या 5 वाईट सवयी आजच करा दूर

तुमच्या मुलांना या 5 वाईट सवयी असतील तर पुढील टिप्स वापरून दूर करू शकता.

Puja Bonkile

Bad Habits Of Children: मुलांच्या संगोपनासाठी पालकांना त्यांची खूप चांगली काळजी घ्यावी लागते. मुलांना वाईट सवयी लागु नये आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या सकारात्मक गोष्टी शिकवणे गरजेचे असते. लहान मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवायचे असेल तर पुढील टिप्स वापरू शकता.

आजच मुलांच्या या वाईट सवयी दूर करा

  • अंगठा चोखण्याची सवय

अनेक लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. ही सवय काही महिन्यांच्या मुलांमध्ये झाली तर समजते, पण कधी कधी ही सवय 2-3 वर्षांच्या मोठ्या मुलांमध्येही असते. जर तुमच्या मुलाला अशी सवय असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगा आणि ही सवय सोडवा.

  • नाकात बोट घालण्याची सवय

जर तुमच्या मुलाला नाकात बोट घालण्याची वाईट सवय असेल तर आजच ही सवय बंद करा. मुलाला कंटाळा आला की ते असे करतात. पण असे करणे अत्यंत असभ्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मुलाला असे करताना पाहाल तेव्हा लगेच त्याला थांबवा आणि त्याला हात धुण्यास सांगावे.

  • हट्टी असण्याची सवय

जर मुलं एखाद्या गोष्टीबद्दल हट्टी असेल तर ती खूप वाईट सवय आहे. अनेक वेळा एखादे लहान मूल रस्त्याच्या मधोमध खेळण्यांसाठी ओरडू लागतात, अशावेळी तुम्हाला लाज वाटते. जर मुल हट्टी असेल तर त्याला शांतपणे आणि संयमाने समजावून सांगावे. अशा मुलांना ओरडुण समजुन सांगु नका.

  • नखे चावण्याची सवय

काही लहान मुलांना नखे चावण्याचीही सवय असते. मुलाची ही सवय थांबवली नाही तर ती आयुष्यभर राहू शकते. तुम्ही अनेक वृद्धांनाही नखे चावताना पाहिले असेल. जर मुल नखे चावत असेल तर त्याला काही कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करावे. हे त्याला या सवयीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

  • ओठ चावण्याची सवय

ही सवय फक्त लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्या लोकांमध्येही असते. ही सवय लवकरात लवकर सोडावी. मुलांना अनेकदा ओठ चावण्याची सवय असते. ही सवय तणावामुळे असू शकते. ही सवय ओठ फाटल्यामुळे देखील होते. ओठ फुटू नयेत म्हणून लिप बामचा वापर करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: दारू पिऊन गाडी चालवणे जीवावर बेतले

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

Ameya Audi: अमेय अवदीचा युरोपात डंका! चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत विजेता, फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

Jasmine Flower: 'जायांचे मळे वाचवायचेच'! ग्रामसभेत ठराव मंजूर; व्यावसायिक, निवासी प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT