Ayurvedic Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Remedies: बीपी अचानक कमी झाल्यास घाबरू नका, करा 'हे' उपाय

Ayurvedic Remedies: बापी अचानक कमी झाल्यास डोकेदुकी, अशक्तपणा यासारखी लक्षणे लागतात.

Puja Bonkile

Ayurvedic Remedies: वाईट लाइफसेटाईल आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आजकाल रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढत आहे.

शरीराचा सामान्य रक्तदाब 120/80 mmHg असावा पण तो 90/60 mmHg च्या खाली आला तर तो कमी रक्तदाब मानला जातो. यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, डोकेदुखी, उलट्या-मळमळ, थकवा, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

योग्य वेळी बीपी नियंत्रित न केल्यास हृदयविकाराचा झटका यांसारख्या धोकादायक आणि जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे आयुर्वेदात सांगतलेले काही उपाय ट्राय करू शकता.

सेंध मीठ

जर रक्तदाब कमी झाला असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी तुम्ही सिंध मीठाचे सेवन करू शकता. यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते.

अचानक रक्तदाब कमी झाल्यास अर्धा चमचा मीठ एक ग्लास पाण्यात मिक्स करून प्यावे.

तुळशीची पाने

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे. कमी रक्तदाबाच्या समस्येमध्ये तुळशीची पाने फायदेशीर मानली जातात.

व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेल्या या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुळशीचे ४ते ५ पानं चघळावी

काळे मिरे

कमी रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही काळे मिरे वापरणे फायदेशीर मानले जाते. हे कमी आणि उच्च रक्तदाब दोन्ही स्थितीत फायदेशीर आहे.

जर तुमचा रक्तदाब अचानक कमी होत असेल तर कोमट पाण्यात काळे मिरे मिक्स करून सेवन करावे. दिवसातून दोन ग्रॅमपेक्षा जास्त काळे मिरे खाऊ नका.

मनुका

कमी झालेला रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मनुका देखील खूप फायदेशीर आहे. 4-5 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. दररोज असे केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अश्वगंधा

अश्वगंधा अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये वापरली जाते. रक्तदाब कमी असला तरीही अश्वगंधाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

यामध्ये असलेले पोषक तत्व आणि गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. एक चमचा अश्वगंधा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT