Sleeping Habits: आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. यामध्ये आपला आहार, पाण्याचे प्रमाण, स्वच्छता याबरोबरच सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची झोप असते.
झोपेचे महत्व मानवासाठी अनन्यसाधारण असे आहे. मात्र आजची तरुणाई याबद्दल बेफिकिर असल्याचे दिसून येते. कधीही कोणत्याहीवेळी झोप घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्यास सुरुवात झाली आहे.
आपण कधीही झोप घेत असू तर आपल्या झोपेची बायोलॉजीकल सायकल बिघडण्यास सुरुवात होते. चला तर आज आपण जाणून घेऊयात कोणत्या वेळची झोप आपल्यासाठी अर्थात आपल्या आरोग्यासाठी चांगली असते.
आयुर्वेदात झोपेचे बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यामुळे झोप कशी व कधी घ्यावी हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात रात्रीची झोप ही स्वाभाविक आहे. कधीकधी आजारपणामुळे तर कधी औषधांमुळेदेखील झोप येते. शरीरात जर कफ असेल तरीही झोप येते. असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याचा पाया झोप असते. त्यामुळे झोपेच्या वेळादेखील निश्चित असणे गरजेचे असते.
आयुर्वेदात रात्री अकराच्या पुढे जागणे अत्यंत चुकीचे मानले असते. रात्री अकराच्या सुमारास शरीरात कफदोषाचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे अकाराच्या दरम्यान झोपल्यास झोप पटकन लागते व त्रास होत नाही. त्याऐवजी रात्री बारा-साडेबारापर्यंत जागल्यास नंतर झोप लागायला बऱ्याच लोकांना त्रास होताना दिसतो.
आपल्या शरीरातील बायॉलॉजिकल घड्याळ वात-पित्त-कफाच्या आधारे चालत असते. सकाळी सहानंतर कफदोष वाढायला लागलेला असतो. अशा वेळी झोपून राहिल्यास शरीत कफदोष वाढून वेगवेगळे रोग उत्पन्न होऊ शकतात.
आधुनिक मतानुसारही सकाळी लवकर उठणाऱ्यांमध्ये कॉर्टिसॉल हॉर्मोन योग्य प्रमाणात स्रवते व त्यामुळे शरीरातील सगळ्या अवयवांचे काम व्यवस्थित चालू राहते. थोडक्यात सांगायचे झाल्यास सकाळी साडेपाच-सहाला उठणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम ठरते.
झोप व्यवस्थित येण्यासाठी काही गोष्ट़ी अत्यंत महत्वाच्या ठरतात.
१. तुम्ही ज्या ठिकाणी झोपणार आहात ते ठिकाण स्वच्छ ठेवावे
२. तुमची गादी जास्त कडक किंवा जास्त मऊ असू नये.
३. तुम्ही जी चादर घेणार आहात ती जास्त भडक रंगाची न घेता हलक्या रंगाची असावी.
४. खोलीत संपूर्ण अंधार असेल तर तुम्हाला चांगली झोप लागू शकते.
दुपारची झोप घ्यावी का?
अनेकांना दुपारची झोप घेण्याची सवय असते. मात्र दुपारची झोप क्वचित प्रसंगी किंवा काही व्यक्तींनी घेतली तर चालू शकते. खूप कष्टाचे काम केलेल्या लोकांनी, आजारी असणाऱ्यांनी, फार चिंता व दुःख असणाऱ्यांनी, लहान मुलांनी वा वृद्धांनी क्वचित दुपारी झोप घेतली तर चालू शकते.
वजन वाढलेले असणाऱ्यांनी, शरीरात कफाचा दोष असणाऱ्यांनी किंवा मोठा आजार असणाऱ्यांनी होता होईल तो दुपारची झोप वर्ज्य करावी. फक्त ग्रीष्म ऋतूत दुपारी झोपलेले चालू शकते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.
दुपारी झोपल्यास शरीरात कफ-पित्तदोष तयार होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी झोप वेळेवर घेणे महत्वाचे म्हणजे योग्यवेळी झोप घेणे महत्वाचे ठरते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.