Skincare In Monsoon: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

Skincare: मुरुमांची समस्या निर्माण होणार नाही.
Skincare
SkincareDainik Gomantak
Published on
Updated on

Skincare: पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. पावसाळ्यात बाहेर फिरायला जाणे आणि खाद्यपदार्थांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात असते. महत्वाचे म्हणजे, भारतात तेलकट पदार्थांना या ऋतूत विशेष पसंती दर्शवली जाते. या सगळ्यात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता असते.

सर्दी , खोकला , ताप या संसर्गजन्य आजारांबरोबरच आपल्यापैकी अनेकजण त्वचाविकारांनादेखील सामोरे जाताना दिसतात. त्यामुळेच आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे होते. आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे.

पावसाळ्यात किंवा थंडीचा परिणाम म्हणून आपण पाणी कमी पितो. मात्र याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आपला चेहरा अथवा आपली त्वचा निरोगी ठेवायची असेल , याबरोबरच मुरुमविरहित ठेवायची असेल तर पावसाळ्यातदेखील भरपूर पाणी पिले पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून मुरुमांची समस्या निर्माण होणार नाही.

त्वचेला पोषण देण्यासाठी मॉइस्चराइरचा वापर करा. याबरोबरच, आपल्या आजूबाजूला आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा उपयोग आपण आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. ग्रीन टी, लिंबू आणि काकडी यांसारखे नैसर्गिक टोनर वापरा. टोनिंगमुळे त्वचेतील घाण निघून जाईल आणि त्वचा कोरडीही होणार नाही.

Skincare
Daily Horoscope 07 July: तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

आपल्यापैकी अनेकजण पावसाळ्यात अतिगरम पाण्याने अंघोळ करतात, त्याचूबरोबर तोंड स्वच्छ करण्यासाठीदेखील ते गरम पाणी वापरतात. मात्र जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी बनते, त्याचा मऊपणा कमी होतो.

त्यामुळे अतिगरम किंवा अतिथंड पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा कोमट पाणी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. पावसाळ्यात आठवड्यातून एकदा स्क्रब केल्याने चेहरा ताजातवाणा राहण्यास मदत होते.

अशाप्रकारे आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांपासून दूरदेखील राहू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com