Sleep Problem Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sleep Problem: तुम्हालाही झोपेची समस्या आहे? 'हे ' 5 नियम पाळा अन् निवांत झोपा

तुम्हालाही रात्रीची निवांत झोप हवी असेल तर या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Sleep Problem: निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारासह पुरेशी झोप देखील गरजेची असते. पुरेशी झोप घेतल्याने आपली पचनसंस्था योग्यरित्या कार्य करते. प्रत्येक व्यक्तीने किमान 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे असे तज्ञांचे मत आहे.

अनेक लोक असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल.या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

1. चहा/कॉफीचे सेवन टाळा

रात्री झोपण्यापुर्वी चहा आणि कॉफी पिण्याची सवय असेल तर बंद करा. कारण हे शरीरातील कॅफिनची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. कॅफीन तुमच्या मज्जातंतूंना उत्तेजित करते. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.यामुळे रात्री झोप येत नाही.

2. मद्यपान टाळा

मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते. मद्यपान केल्याने झोपेवर विपरित परिणाम होतो. यामुळे दुसऱ्या दिवशी कामवर लक्ष केद्रित करु शकत नाही. चांगली झोप हवी असेल तर मद्यपान करणे टाळावे.

3. जेवणाची योग्य वेळ

रात्रीचे जेवण लवकर करणे चांगले असते. कारण जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता तेव्हा तुम्हाला छातीत जळजळ होते आणि लवकर झोप येत नाही. रात्री आपली पचनसंस्था देखील मंदावते. यामुळे रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी करावे.

4. रात्री हलके जेवण करावे

रात्री जड जेवण केल्याने अन्न पचण्यास खूप त्रास होतो. यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे रात्री मुगाची खिचडी किंवा भाकरी खाण्यास प्राधान्य द्यावे.

5. पोषक तत्व

रात्रीच्या जेवणात पोषक घटकांचा समावेश करावा. फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादींचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने मध्यरात्री भुक लागणार नाही आणि तुम्हाला शांत झोप लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT