Astro Tips For Gift Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Gift Idea: 'या' 5 वस्तू नववधूला चुकूनही भेट म्हणून देऊ नका

Puja Bonkile

Astro Tips For Gift Idea: ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टींसाठी उपाय सांगितलेले आहे. त्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला कोणतेही समस्या निर्माण होणार नाही. लग्नाच्या वेळी मुलगी सासरच्या घरी निघून गेल्यावर आई आणि कुटुंबातील इतर सदस्य तिला विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात. असे मानले जाते की या सर्व भेटवस्तू वधूच्या जीवनात प्रेम आणि सुसंवाद जोडतात.

असेही म्हटले जाते की जेव्हा तुम्ही नवीन वधूला भेटवस्तू देणार असाल तेव्हा तुम्ही प्रामुख्याने ज्योतिषशास्त्राचे काही नियम पाळले पाहिजेत. तुम्ही वधूला नेहमी अशाच वस्तू द्याव्यात ज्यामुळे तिच्या आयुष्यात समृद्धी येईल. यासोबतच ज्योतिषशास्त्रात देखील तुम्हाला लग्नात वधूला कोणत्या वस्तु द्याव्या हे सांगितलेले आहे.

  • घड्याळ

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की नवविवाहित जोडप्याला कधीही लग्नाची घड्याळ भेट देऊ नये. खरं तर, घड्याळ हे चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचे प्रतीक मानले जाते आणि वधूच्या वैवाहिक जीवनासाठी नकारात्मक शगुन मानले जाते.

असे मानले जाते की अशा भेटवस्तूंमुळे वैवाहिक कलह किंवा वेळ-संबंधित समस्या उद्भवू शकतात. नववधू जेव्हा तिच्या आई-वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जाते तेव्हा तिला फक्त चांगल्या वेळेचा आशीर्वाद द्यावा जेणेकरून ती आनंदी राहते. 

  • काळ्या रंगाच्या वस्तू

ज्योतिषशास्त्रात काळा रंग नकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. नवविवाहित महिलेला काळ्या रंगाच्या वस्तू जसे की कपडे किंवा इतर साहित्य भेटवस्तू दिल्याने तिच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे काळ्या रंगाच्या वस्तु भेट म्हणून देऊ नका. काळा रंग हा शनिदेवाचा रंग मानला जातो आणि या रंगाच्या वस्तू भेट दिल्याने नववधूच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. 

  • तीक्ष वस्तु

कोणतीही तीक्ष्ण वस्तू नवीन वधूला भेट म्हणून देऊ नका. असे मानले जाते की चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू भेट म्हणून दिल्याने नातेसंबंधातील अंतर वाढते आणि वधूच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. याशिवाय वधूला कुठलाही आंबट पदार्थ किंवा कडू पदार्थ भेट म्हणून देऊ नये या गोष्टींमुळे नात्यात कटूता येऊ शकते. 

  • वधूला काचेची भांडी भेट देऊ नका

भेटवस्तूंसाठी ग्लास देखील नकारात्मक प्रतीक मानला जातो. खरे तर ही गोष्ट अशी आहे की वधूने सासरी नेली तर वाटेत ती तुटून पडू शकते आणि तुटलेली वस्तू सासरी नेणे वधूसाठी शुभशकून मानले जात नाही. तसेच वधूला रिकामा डबा किंवा बरणी भेट देणे देखील नकारात्मक चिन्ह मानले जाते.

  • तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू

जर तुम्ही वधूला कोणतीही तुटलेली वस्तू भेट दिली तर ते तुमच्या आयुष्यातही नकारात्मकता आणू शकते. तसेच, तुम्ही वधूला कधीही वन्य प्राण्यांचे फोटो, महाभारतातील फोटो किंवा नकारात्मक भावनांशी निगडीत काहीही असे नकारात्मक प्रतीक असलेल्या भेटवस्तू देऊ नका. वधूला नेहमी अशा गोष्टी भेट द्या ज्यामुळे तिच्या आयुष्यात प्रेम आणि सकारात्मकता येईल आणि प्रेम बहरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT