Artificial Sweeteners Type 2 Diabetes Risk Study Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Risk: साखर सोडली तरी डायबिटीसचा धोका कायम! 'शुगर फ्री' खाणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका 31 टक्के जास्त; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Artificial Sweeteners Type 2 Diabetes Risk Study: आजकाल बदलत्या जीवनशैलीत आणि वजन वाढण्याच्या भीतीने अनेक जण साखर सोडून 'शुगर फ्री' किंवा आर्टिफिशिअल स्विटनर असलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत आहेत.

Manish Jadhav

Artificial Sweeteners Type 2 Diabetes Risk Study: आजकाल बदलत्या जीवनशैलीत आणि वजन वाढण्याच्या भीतीने अनेक जण साखर सोडून 'शुगर फ्री' किंवा आर्टिफिशिअल स्विटनरयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत आहेत. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असते आणि ते आरोग्यासाठी उत्तम असतात, असा लोकांना विश्वास आहे. मात्र, 'फ्रंटियर्स ऑफ न्यूट्रिशन' या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाने या विश्वासाला मोठा धक्का दिला. या संशोधनानुसार, शुगर फ्री खाणाऱ्या लोकांमध्ये 'टाइप-2 मधुमेहाचा' (Diabetes) धोका तब्बल 31 ते 38 टक्क्यांनी वाढू शकतो.

ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे 36000 हून अधिक लोकांवर तब्बल 14 वर्षे लक्ष ठेवण्यात आले होते. या अभ्यासातून असे दिसून आले की, दररोज आर्टिफिशिअल स्विटनरयुक्त 'डाएट सॉफ्ट ड्रिंक्स' पिणाऱ्या लोकांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका 38 टक्क्यांनी वाढतो, जो अगदी सामान्य साखरयुक्त ड्रिंक्स पिणाऱ्यांच्या (28%) तुलनेतही अधिक आहे. साखरे ऐवजी रासायनिक घटकांपासून बनवलेल्या या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्यास त्याचा मानवी पचनसंस्थेवर आणि चयापचय क्रियेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे कृत्रिम घटक पोटात असलेल्या उपयुक्त बॅक्टेरियांचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता कमकुवत होते. आंतड्यांचे संतुलन बिघडल्यामुळे शरीरात आतून सूज येते, जी पुढे जाऊन मधुमेहाचे मुख्य कारण ठरते. याशिवाय, 'शुगर फ्री' पदार्थ खाल्ल्यावर मेंदूला गोडव्याचा संदेश मिळतो, परंतु शरीराला प्रत्यक्षात कॅलरीज मिळत नाहीत. यामुळे शरीरातील संप्रेरकांचा (Hormones) समतोल बिघडतो आणि माणसाला वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. त्यामुळे केवळ कॅलरी कमी आहे म्हणून 'शुगर फ्री' पर्यायांचा थेट वापर करणे योग्य नाही. आहारात असा कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा हे पदार्थ खाण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT