Arthritis Pain During Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Arthritis Pain During Monsoon: पावसाळ्यात गुडघे अन् सांधेदुखीचा त्रास का वाढतो? मग करा 'हे' उपाय

पावसाळ्यात गुडघे आणि सांधेदुखीची समस्या असेल कर हे घरगुती उपाय करु शकता.

Puja Bonkile

Arthritis Pain During Monsoon: पाऊस हा कडक उन्हापासून दिलासा देणारा असतो. परंतु गुडघे आणि सांधेदुखी किंवा संधिवात असलेल्या रुग्णांसाठी हा ऋतू वेदना वाढविणारा आहे. 

सांधेदुखीचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या वेदनांवर हवामानाचा परिणाम होतो. त्यांना हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त वेदना होतात.

ही समस्या असणाऱ्या रूग्णांना पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्याच्या दिवसात अधिक त्रास होतो. वातावरणात झालेल्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल होतात. तज्ञांच्या मते ही समस्या असणाऱ्या लोकांना खास काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत आणि थंडीमुळे सांध्यातील सूज वाढते आणि या ऋतूमध्ये युरिक अॅसिडची पातळीही जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातही सांधेदुखीचे प्रमाण वाढते. म्हणूनच या ऋतूत वेदना वाढू नयेत यासाठी काही खास उपाय करायला हवेत. 

  • अॅक्युपंक्चर

प्राचीन चिनी औषधातून मिळालेली ही उपचारपद्धती ऑस्टियोआर्थरायटिस, फायब्रोमायल्जिया, पाठदुखी, मान आणि खांदेदुखी, बर्साइटिस, कार्पल टनल सिंड्रोम यासाठी उपयुक्त आहे. Arthritis.org नुसार या उपचारात शरीरावरील विशिष्ट एक्यूपॉइंट्सवर त्वचेमध्ये पातळ, लहान सुया घातल्या जातात. हे तंत्रिका, स्नायू आणि संयोजी ऊतकांना उत्तेजित करण्यासाठी, रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक सक्रिय करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

  • तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे

पावसाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वजन आणि आहाराकडे लक्ष दिल्यास युरिक अॅसिड तसेच वेदनांवर नियंत्रण ठेवता येते. नियमित शारीरिक हालचालींसह संतुलित आहार एकत्र करून वजन नियंत्रणात ठेवता येते. आहारात फळे, भाज्या, प्रथिने, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि कडधान्यांचा समावेश करावा.

  • मसाज

मसाज केल्याने देखील वेदना कमी होउ शकतात. जेव्हा सांधे विशेषतः कोमल आणि संवेदनशील असतात, तेव्हा अतिशय हलक्या हातांनी येथे मसाज करावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT