Anti Cancer Foods: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anti Cancer Foods: 'या' फळं अन् भाज्या खाल्यास कॅन्सरचा धोका 40% कमी होऊ शकतो

कॅन्सर हा एक प्राणघातक आजार असून तो लास्ट स्टेजमध्ये आल्यावर त्याचे लक्षण जाणवतात.

Puja Bonkile

Anti Cancer Foods: कॅन्सर हा एक प्राणघातक आजार असून तो लास्ट स्टेजमध्ये आल्यावर त्याचे लक्षण जाणवतात. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि महिलांमध्ये गर्भाशय-स्तन कर्करोगाचा धोका सर्वाधिक दिसून येत आहे. यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे.

आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी कॅन्सरविरूद्ध लढण्यासाठी उपाय करणे सुरू ठेवावे. ज्या लोकांना आधीच कॅन्सरची लक्षण जाणवतात त्या लोकांनी वेळीच काळजी गेणे गरजेचे आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की काही फळं आणि भाज्यांमध्ये कॅन्सरचा प्रभाव कमी करणारे घटक आहेत. यामुळे हे फळ आणि भाज्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलला संशोधकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर खाद्यतेल म्हटले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की ते कर्करोगाचा धोका देखील कमी करू शकतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरते.

  • दालचिनी

दालचिनी प्रत्येकांच्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे मसाले आहे. अभ्यासामध्ये दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यास रक्तातील साखर आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी विशेष फायदे मिळू शकतात. टेस्ट-ट्यूब अभ्यासात असे आढळून आले आहे की दालचिनी कॅन्सरच्या पेशींचा प्रसार थांबवण्यास देखील मदत करू शकते. संशोधकांना असे आढळून आले की दालचिनीचा अर्क कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतो.

  • गाजर

संशोधकांना असे आढळून आले आहे की गाजर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की गाजर खाल्ल्याने काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. पाच अभ्यासांच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की गाजर खाल्ल्याने कोलन कॅन्सरचा धोका 26% पर्यंत कमी होतो . याशिवाय गाजर खाणाऱ्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोकाही 18 टक्क्यांनी कमी होतो.

  • ब्रोकोली

ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ब्रोकोलीमध्ये अँटी-कार्सिनोजेनि,सल्फोराफेन, क्रूसीफेरस गुणधर्म असतात. टेस्ट -ट्यूब अभ्यासात असे दिसून आले आहे की सल्फोराफेन असलेले पदार्थ स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींचा आकार आणि संख्या 75% पर्यंत कमी करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT