Beauty Tips: बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होते, पण आता टीव्ही अभिनेत्रीही त्याबाबतीत मागे नाहीत. आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी टीव्ही अभिनेत्री स्कीन प्रॅाडक्टसोबत नैसर्गिक आणि घरगुती उपाय पण करतात. आज आपण 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या चमकदार त्वचेचे गुपित जाणून घेणार आहोत. पवित्र रिश्ताच्या सुरुवातीच्या टप्प्यात अंकिताची त्वचा आजच्यासारखी एवढी ग्लोइंग नव्हती. आज तिच्या ग्लोइंग स्कीन अन् सुंदरतेपुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. चला तर मग जाणून घेऊया, अंकिताच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य.
अंकिता लोखंडे प्रथम तिची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. दिवसाची सुरुवात ती सकाळ पाणी पिण्याने करते. अंकिता सकाळी उठल्यावर मध आणि लिंबू मिसळलेले कोमट पाणी पिते. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होऊ शकते. बॉडी डिटॉक्स असणंही खूप गरजेचं आहे. ही सवय त्वचेवर ग्लो आणण्यात महत्त्वाची ठरते. याशिवाय अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) रोजच्या दिनक्रमात व्यायाम करायला विसरत नाही. ती सुमारे 1 तास व्यायाम करते आणि भरपूर घाम गाळते. अंकिता म्हणते की व्यायाम केल्याने केवळ शरीरच नाही तर त्वचाही चमकदार राहते.
याशिवाय अंकिता तिची स्कीन (Skin) ग्लोइंग ठेवण्यासाठी घरगुती ट्रिक देखील वापरते. अंकिताला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती दूध आणि मधाच्या मिश्रणाचा फेस पॅक बनवते आणि चेहऱ्यावर लावते. यामुळे तिची त्वचा ग्लोइंग आणि सॅाफ्ट राहते. दुधामध्ये असलेले कोलेजन प्रोटीन त्वचेला छान ठेवण्यास मदत करते.
तर मध त्वचेला आर्द्रता देते. मधामध्ये आढळणारे काही गुणधर्म त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्वचेवरील डाग घालवण्यास देखील मदत करतात. त्यामुळे तुम्हीही त्वचेशी संबंधित समस्यांमुळे वैतागले असाल तर अंकिताच्या या टिप्स फॉलो करू शकता.
तसेच, अंकिता नेहमी तीच्या पर्समध्ये गुलाबपाणी ठेवते. आणि जसा वेळ मिळेल तसं गुलाब जल लावते. गुलाब जल, मध आणि दूध या गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. नैसर्गिक उपाय करुन तुम्हाला त्वचेचे सौंदर्य वाढवायचे असेल तर नक्की याचा वापर त्वचेसाठी करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.