Ambedkar Jayanti 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ambedkar Jayanti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' 10 अनमोल विचार बदलेल तुमचे आयुष्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Ambedkar Jayanti 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जात आहे. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे.

महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करतात.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे 10 प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात. 

  1. मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे.

  2. मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

  3. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

  4. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे.

  5. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी.

  6. अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो. 

  7. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

  8. धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. 

  9. माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे

  10. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराम रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन.

अस्पृश्यता पाळली जात असताना, सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हटले जाते. 

4 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते.

तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.

आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT