Tips For Healthy Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips For Healthy Diet: सतत भूक लागते? चुकूनही 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

अनेक लोकांना जेवन केल्यानंतरसुद्धा भुक लागते.

दैनिक गोमन्तक

Tips For Healthy Diet: अनेक लोकांना जेवण केल्यानंतरसुद्धा काही तासानंतर भूक लागत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना पोटभर जेवल्यानंतर पुन्हा भूक लागते. 

काही लोक आहेत जे रागाने किंवा दुःखी असताना स्वतःला शांत करण्यासाठी खाणे सुरू करतात. जास्त खाण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु त्यामागील कारणे शोधणे खूप गरजेचे आहे. 

जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी (Heart) संबंधित समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाता तेव्हा तुम्हाला सूज येणे, छातीत जळजळ आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चला तर मग जाणून घेऊया भुक लागण्यामागे कोणती कारणे आहेत.

या कारणांमुळे तुम्हाला नेहमी भूक लागते

1. झोप येत नाही

तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त भूक लागते. कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमची भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्या लोकांना झोप येत नाही, त्यां लोकांना खूप भूक लागते आणि जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत नाही.

2. शरीरात प्रथिनांची कमतरता

शरीरात प्रथिनांची कमतरता असतानाही तुम्हाला नेहमी भूक लागते. प्रथिने तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमची कॅलरी कमी होते. आहारात (Diet) प्रथिनांचा समावेश केल्याने शरीरात काही संप्रेरकांचे उत्पादन वाढते. जे तुम्हाला पोट भरण्याचे संकेत देतात आणि तुमची भूक नियंत्रित ठेवतात.


3. डिहाइड्रेशन

डिहाड्रेशनची समस्या कमी करण्यासाठी पाणी भरपुर पिणे गरजेचे असते. तुमच्या हृदयाचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि पाचक आरोग्यासाठी पाणी खूप फायदेशीर मानले जाते. पाणी तुम्हाला पोटभर ठेवण्यास मदत करते. तुम्ही जेव्हा पाणी पित नाही, तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते.

4. मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांना सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते. कारण रक्तातील ग्लुकोज इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागते. 

मधुमेहाच्या काही लक्षणांमध्ये - जास्त तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, अंधुक दृष्टी, थकवा आणि पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे.

5. गर्भधारणा

जास्त भूक लागण्यामागे गर्भधारणा हे देखील आणखी एक कारण आहे. तुमचे शरीर असे करते जेणेकरून तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतील. तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि योग्य अंतराने खाणे गरजेचे आहे.

भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात करा हे बदल

अंडी, दही इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

जास्त मीठ आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे

पाणी भरपुर प्यावे. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस देखील घेऊ शकता.

अल्कोहोलचा वापर कमीत कमी करा. दारू प्यायल्यानंतर तुमची भूक वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vivo Y500i launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, किंमत फक्त...

Goa Assembly Session: हिवाळी अधिवेशनाचा हायव्होल्टेज प्रारंभ! 'हडफडे' अग्नितांडवावरून विरोधक आक्रमक; राज्यपालांच्या भाषणदरम्यान 'शेम-शेम'च्या घोषणा

T20 World Cup: ICC चा मोठा निर्णय! बांगलादेशची मागणी धुडकावली; आता भारतातच खेळावं लागणार

Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

SCROLL FOR NEXT