Mahavir Jayanti 2023: भगवान महावीरांचे दहा अनमोल विचार, वाचा एका क्लिकवर

भगवान महावीर यांना जैन धर्मात अत्यंत आदराचं स्थान आहे.
Mahavir Jayanti 2023
Mahavir Jayanti 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahavir Jayanti 2023: चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या त्रयोदशीला भगवान महावीर यांचा जन्म झाला होता. आज भगवान महावीर जयंती आहे.

भगवान महावीर यांना जैन धर्मात आदराचं स्थान आहे. एक राजकुमार असूनही भगवान महावीर यांनी सत्याच्या शोधात आपले सारे काही त्याग केले होते.

अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना सत्याचे आकलन झाले. त्यानंतर या थोर पुरुषाने जगाला अहिंसा, सत्य यांचा संदेश दिला. आज भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने 10 अनमोल विचार जाणुन घेणार आहोत.

  • भगवान महावीरांचे 10 अनमोल विचार

1. अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे. जो सर्वांच्या कल्याणाची कामना करतो.

2. स्वतःवर विजय मिळवणे हे लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यासारखे आहे.

3. खरा शत्रू तुमच्या आतच राहतो. तो शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान आणि लोभ. त्याला आतून काढून टाका. तुमच्या आत्म्यापलीकडे कोणताही शत्रू नाही.

4. देव इतरांशिवाय अस्तित्वात नाही आणि प्रत्येकाने योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्याला देवत्व प्राप्त होऊ शकते.

5. एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्याऐवजी त्याला शांततेत जगू द्या आणि समाधानात जगू द्या, तरच तुमचे कल्याण होईल.

Mahavir Jayanti 2023
Yoga Mantra For Summer: उन्हाळ्यात कूल अन् फ्रेश रहायचंय असेल तर करा 'हे' 5 योगासन

6.स्वत:शी लढा, बाहेरील शत्रूशी काय लढायचे ते सहज साध्य आहे.

7. जे तुम्हाला स्वतःसाठी करायला आवडत नाही ते तुम्ही इतरांसाठी कधीही करू नये.

8. माणूस हा त्याच्या विचारांनी बनलेला प्राणी आहे, तो जे काही विचार करतो, तसा तो बनतो.

9. आत्म्याची सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या वास्तविक रूपाला न ओळखणे आणि हे स्वत:ला जाणून घेऊनच नीट केलं जाऊ शकतं.

10. जगात दोनच सत्य आहेत जी दिसत नाहीत मात्र त्यांचं अस्तित्व पदोपदी जाणवतं. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे मृत्यू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com