Air Purifier Plants Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Air Purifier Plants: घरात लावा 'ही' रोपं; मिळेल सौंदर्य अन् फ्रेश हवा

प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी आणि घराची हवा स्वच्छ करण्यासाठी पुढील 5 रोपे घरात लावावी.

Puja Bonkile

Air Purifier Plants: वातावरणातील बदलांमुळे हवेत अनेक बदल जाणवत आहेत. तसेच दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत फटाक्यामुळे वायु प्रदुषण वाढते. याचा तुमच्या आरोग्यावर देखील विपरित परिणाम होतो. प्रदुषणापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात पुढील रोप लावू शकता.

स्नेक प्लांट

हे रोप सापासारखे दिसते, म्हणून याला स्नेक प्लांट म्हणतात. घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी स्नेक रोप लावु शकता. यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. स्नेक वनस्पती फॉर्मल्डिहाइड, टोल्युइन आणि नायट्रोजन डायऑक्साइड सारखे हानिकारक वायू शोषून घेते. स्नेक प्लांट ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सोडतो. त्यामुळे हवा शुद्ध राहते.

लेडी पाम प्लांट

लेडी पाम हे रोप प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवा स्वच्छ करण्यासाठी देखील उत्तम आहे. त्याच्या पानांमध्ये प्रदूषण शोषून घेण्याचे गुणधर्म असतात.

तुळस

तुळशीचे रोप घराल लावणे शुभ मानले जाते. तुळस मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडते. तसेच यामध्ये अनेक गुणधर्म असतात. तुम्ही रोज सकाळी चहामध्ये तुळशीचे पानं टाकून सेवन करू शकता. यामुळे अनेक आजार देखील दूर राहतात.

रबर प्लांट

घर किंवा ऑफिसमध्ये बंद जागेत हवा स्वच्छ आणि फ्रेश राहण्यासाठी तुम्ही रबर प्लांट लावू शकता. या रोपाला छोडाच सुर्यप्रकाश पुरेसा आहे. ही वनस्पती घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मगत करते.

स्पायडर प्लांट

घरामध्ये स्पायडर प्लांट लावल्यास फॉर्मल्डिहाइड आणि विषारी वायू शोषले जाऊ शकतात. हे घरातील हवा स्वच्छ करण्याचे काम करते. ही झाडे घरात लावल्याने हवा शुद्ध राहते आणि प्रदूषण कमी होते.

बांबु प्लांट

घरात बांबूचे रोप लावूनही हवा स्वच्छ ठेवता येते. हे रोप घरात लावल्याने हवेतील हानिकारक वायू शोषून घेतात आणि धुळीचे कणही कमी होतात. बांबूचे रोप लावल्याने घरातील हवा शुद्ध राहते. तसेच यामुळे घराची शोभा वाढवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT