Shani Dev Aarti: हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की जेव्हा शनिदेव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्याचे सर्व संकट दूर करतात. धार्मिक ग्रंथांमध्ये शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले आहे. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.
शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर, ज्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात, अशा लोकांना जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर शनिवारी पूजेसोबतच शनिदेवाची आरतीही करावी. शनिदेवाची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.