<div class="paragraphs"><p>A collection of English stories by Willie Goes 'My Husband's Mysterious Mistress' is about to be published</p></div>

A collection of English stories by Willie Goes 'My Husband's Mysterious Mistress' is about to be published

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

विली गोएसांचा 'माय हजबंड्‍स मिस्टरिअस मिस्ट्रेस' इंग्रजी कथांचा संग्रह

दैनिक गोमन्तक

विली गोयस हे खरे तर उपयोजित कलेचे (अप्लाइड आर्ट) शिक्षक. पण गेली सुमारे वीस वर्षे त्यांचा वावर साहित्य क्षेत्रात देखील हिरीरीने चालू आहे. साहित्याच्या क्षेत्रात एकांतात केल्यासारखी त्यांची साधना सातत्याने चालू असते. 2000 साली त्यांची पहिली कादंबरी (Novel) आलतडी आनि पलतडी' प्रकाशित झाली होती. त्यानंतर नियमित काळात त्यांची पुस्तके (Books) प्रकाशित होत राहिली आहेत. इंग्रजी आणि कोकणी या दोन्ही भाषांमधून ते लिहितात.

'माय हजबंडस मिस्टरिअस मिस्ट्रेस' हा त्यांच्या इंग्रजी कथांचा संग्रह आता प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी लिहिलेल्या 15 कथांचा हा संग्रह आहे. 'कोबोज सोफा अ‍ॅण्ड अदर शॉर्ट स्टोरीज फ्रॉम गोवा' ह्या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहनंतर प्रकाशित होणारा विली गोएस यांचा हा दुसरा कथासंग्रह आहे.

'माय हजबंडस मिस्टीरियस मिस्ट्रेस' ही या कथासंग्रहातील एक कथा आहे. या कथेतील एका अशांत आणि अस्वस्थ स्त्रीला आपल्या नवऱ्याचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याबद्दल सतत शंका येत असते. परंतु त्याविषयी नवऱ्याकडे बोलण्यास ती कमी पडते व तिच्या आशंकित अवस्थेमधून ही कथा पुढे सरकते. या संग्रहातल्या साऱ्याच कथा गोव्यातल्या व्यक्तिरेखा आणि गोव्याची पार्श्वभूमी असलेल्या आहेत. गोमंतकीयांची सामाजिक जीवनशैली आणि नातेसंबंध याकडे या कथा चिकित्सकपणे नजर टाकतात.

'मिझरेबल क्रिझोलोगो' या कथेची पार्श्वभूमी गोव्यातील (Goa) खाणबंदी ही आहे, 'ब्लॅकमेल' ही कथा अशा काळात घडते, ज्या काळात रंगीत छायाचित्रांची सुरुवात होऊन ही छायाचित्रकला सर्वसामान्यांच्या घरात प्रवेश करत होती. 'ओह! ओह! ग्रशिया' ही कथा ब्रिटनमध्ये स्थायिक होऊ पाहणाऱ्या गोमंतकीयांच्या पार्श्वभूमीवर घडते. ' नोट माय तियात्र' या कथेतून विली गोएस काही ज्येष्ठ तियात्र कलाकारांच्या मानसिकतेला स्पर्श करतात. रंगमंचावर त्यांनी सादर केलेल्या तियात्रांच्या संहिता छापून प्रकाशित कराव्यात की नाही हा त्यांच्यासमोर उभा असलेला एक नैतिक प्रश्न आहे. 'दि व्हॅलेंटाईन डे', 'द गुड अ‍ॅन्ड द बॅड', 'ब्लड इज थिकर', ए वंडरर्स लेमेंट', रेमंड गोज अब्रोड' या ह्या संग्रहातल्या इतर कथा आहेत. कथांच्या वेधक शीर्षकांवरूनदेखील विली आपल्या कथानबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतात. ओघवती आणि सोपी इंग्रजी भाषा हेदेखील विली गोएस यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

कथा-कादंबरी क्षेत्रात संचार करणारे विली गोयस ' गुलाब', 'गोवन रिव्ह्यू','परमळ' इत्यादी नियतकालिकांमधून सातत्याने लिहित असतात. त्यांच्या 'खांद' या लघुकादंबरीला कोकणी भाषा मंडळाचा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार (Award) आणि 'कात्रीन' या त्यांच्या कादंबरीला अखिल भारतीय कोकणी लेखक संघटनेचा पुरस्कार लाभला आहे. 'कात्रिन' ही त्यांची बहुचर्चित आणि बहुसंख्य वाचकांकडून वाचली गेलेली कादंबरी आहे. 'मन सावरोना', 'कांटो', 'पेद्रू तिवा', 'कापाज जाकी' ही त्यांनी कोकणी भाषेत लिहिलेली दुसरी पुस्तके आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa News : तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही त्यांनी सामान्यांसाठी काय केले? मुख्यमंत्री सावंत

Pernem News : भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी; खलपांना लोकसभेत पाठवा

Loksabha Election 2024 : काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Mapusa Amit Shah Meeting : भाऊंसाठी आज ‘शाही’ सभा; म्‍हापशात जय्‍यत तयारी

SCROLL FOR NEXT