World Largest Dosa Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Largest Dosa Video: 75 शेफ आले सोबत अन् बनवला जगातील सर्वात लांब डोसा, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

Guinness World Records Holder World's Largest Dosa Video: डोसा हा दाक्षिणात्य पदार्थ सर्वांचा आवडता आहे. एमटीआर फूड्सच्या 75 शेफनी 123 फूट जगातील सर्वात लांब डोसा बनवला असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले आहे.

Puja Bonkile

123 Foot Worlds Longest Dosa in Bengaluru

डोसा हा दाक्षिणात्य पदार्थ सर्वांचा आवडता आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक असो डोसा खायला सर्वांना आवडते. डोसा सर्वच हॉटेल्समध्ये मिळतो. याची वाढती लोकप्रियता पाहून एमटीआर फूड्सच्या 75 शेफनी 123 फूट जगातील सर्वात लांबीचा डोसा बनवला असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले आहे. या डोसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हारल होत आहे.

कसा बनवला एवढा लांब डोसा

शेफ रागी ही आनंदाची बातमी देताना म्हणाले की हे यश 15 मार्च 2024 रोजी बेंगळुरू येथील एमटीआर फॅक्टरीमध्ये प्राप्त झाले आहे. या यशात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे आणि संघांचे अभिनंदन केले आहे.

हा डोसा बनवण्याची प्रक्रिया सामान्य डोस्यापेक्षा वेगळी होती. हा डोसा बनवण्यासाठी 123 फूट तवा बनवला गेला आणि नंतर तो गरम केला गेला. पॅनचे तापमान सतत तपासण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर वापरला गेला होता.

तव्याचे तापमान सेट झाले की, डोसा पिठ हॉपरच्या साहाय्याने तव्यावर पसरवले होते. सर्व 75 शेफनी डोसा बनवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू ठेवले आणि 110 अपयशी ठरल्यानंतर त्यांनी 123 फूट लांब डोसा बनवण्यात यश मिळाले.

123 फूट लांबीचा डोसा

100 व्या वर्धापन दिनानिमित्त, एम अॅग्रीमेंट गारमेंट्सने लोर्मन किचन इक्विपमेंट्सच्या सहकार्याने 123 फूट लांबीचा डोसा तयार केला आहे. जगातील सर्वात मोठ्या डोसा म्हणून गिनीज बुकने वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये समावेश केला आहे.

शेफ रेगी मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली 75 शेफच्या टीमने खुप मेहनत करून हा डोसा बनवला आहे. हा डोसा बनवण्यासाठी शेफच्या टीमने लाल तांदूळ डोसा पिठाचा वापर केला आहे. शेफ रेगी मॅथ्यूजने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे आणि टीमचे आभार मानणारी एक खास टीप लिहिली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT