दमा हा फुफ्फुसांचा एक दीर्घ आजार आहे जो श्वास घेण्यास अडचण आणतो, मुख्यत: फुफ्फुसांमधील हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. जास्त वजन वाढल्यामुळे दमा वाढू शकतो. त्यासाठी डॉक्टर अनेक उपाय सुचवतात. मात्र निरोगी आणि संतुलित आहार घेणे हे कोणत्याही आजारासाठी जास्त महत्वाचे आहे. ज्यामध्ये भरपूर फळभाज्यांचा समावेश असेल. बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आणि ई सारख्या फळांचा समावेश आहारामध्ये असायला पाहिजे.
काही पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला दम्याची लक्षणे जाणवताता म्हणून असे पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला तीव्र दम्याचा त्रास असेल आणि तुमची नियमित औषधे तुम्हाला आवश्यक आराम देत नसतील, तर काही नैसर्गिक उपायांमुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो. जाणून घेवूया काही घरगुती नैसर्गिक उपचारांबद्दल...
१) लसूण (Garlic )
लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यामध्ये शरिरीतील एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दमा हा एक दाहक रोग असल्यामुळे, लसूण त्या लक्षणांपासून तुम्हाला मुक्त होण्यास मदत करू शकतो.
२) अदरक
अदरक ही उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये एंटी-बायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे श्वसनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. अस्थमा दुर करण्यासाठी अदरक तोंडावाटे चावून त्याचा रस आपण प्यायला तर फुफ्फुसाच्या एकूण कार्यामध्ये सुधारणा होते.
३) मध
घसा कोरडा पडला असेल आणि तुमचा आवाज बसला असेल तर खोकण्याचे प्रमाण वाढते अशा वेळी खोकला कमी करण्यासाठी मध घरगुती उपायांमध्ये वापरले जाते. तुमचा त्रास कमी करण्यासीठी तुम्ही हर्बल चहासारख्या गरम पेयामध्ये मध मिसळू शकता.
४) निलगिरी तेल
नाकातून हवा जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणून नीलगिरीचे तेल वापरले जाते. ज्यामुळे दम्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. नीलगिरीचे तेल ब्लॉक झालेले नाक मोकळे करण्यास मदत करते.
५) अंजीर
अंजीर दम्याचा सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार आहे. कफ काढून टाकण्यास आणि श्वसनाचे आजार दुर करण्यासाठी अंजीर मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
६) कांदा
कांद्यामुळे नाकातील कफ साफ होवून मोकळा श्वास घेता येतो. कांद्यामध्ये एंटि-बायोटिक गुणधर्म देखील आहेत जे दम्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकतात.
७) हळद
हळद पावडरमध्ये फायटोकेमिकल कंपाऊंड नावाचा पदार्थ असतो, ज्यात एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि दम्याच्या लक्षणांवर हा एक उत्तम उपाय असल्याचे मानले जाते. त्यामुळे दुधात, चहात हळद घालून नेहमी प्यायले जाते.
८)मेथी
प्रत्येक घरात मेथी आढळते. मेथीच्या वापराने तुम्ही दम्याचा उपचार करू शकता. दम्यावरील घरगुती उपायांसाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकता. मेथी शरीरातील अंतर्गत ऍलर्जी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. काही मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकळून प्यायाल्याने फायदा होतो.
९)कारले
दम्यापासून आराम देण्यासाठी कारल्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.
मुळापासून दम्याचा उपचार करण्यासाठी तुम्ही कारल्याचा वापर करू शकता. एक चमचा कारल्याची पेस्ट मध आणि तुळशीच्या पानांचा रस मिसळून घेतल्याने दम्याचा त्रास कमी होतो.
१०) व्हिटॅमिन सी फूड्स
व्हिटॅमिन-सी दम्यासाठी खूप फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्या खाणे जेवणात लिंबू , संत्री, बेरी, स्ट्रॉबेरी आणि पपई चा समावेश करणे गरजेचं आहे. पपई हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे पपईच्या ज्युसचे जास्त प्रमाणात सेवन करा. भाज्यांमध्ये फ्लॉवर आणि कोबीचा वापर करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.