रेल्वे प्रवास: भारतात अशा काही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, ज्यातून केलेला प्रवास एखाद्या राजेशाही थाटाचाच अनुभव देतो.
जगातील सर्वात महागडी रेल्वे: राजेशाही थाटाचा अनुभव देणारी जगातील सर्वात महागडी रेल्वे तुम्हाला माहितीये का? या रेल्वेचं भाडही तेवढचं महाग आहे.
Venice Simplon Orient Express ही जगातील सर्वात महागडी लक्झरी ट्रेन असल्याचा दावा केला जातो.
बेलमंड कंपनी: Venice Simplon Orient Express ही ट्रेन एक्सक्लूसिव बेलमंड कंपनी द्वारा चालवली जाते.
सुविधा: मार्बलची फरशी असणारे एन्सुइट बाथरुम, 24 तासांची बटलर सुविधा, फ्री फ्लोइंग शॅम्पेन अशा सुविधा या रेल्वेत मिळतात.
युरोपीय शहरांची सफर: लंडन, पॅरिस, व्हेनिस, प्राग, बुडापेस्ट आणि व्हिएना यांसारख्या प्रमुख युरोपीय शहरांची सफर या रेल्वेने करता येते.
भाडे: या रेल्वेमध्ये असणाऱ्या L'Observatoire लक्झरी सुईटसाठी एका रात्रीसाठी तब्बल £80,000 म्हणजेच 88,00,000 रुपये इतके भाडे द्यावे लागते. हे एक खास सुईट असून, त्याला 'आर्टवर्क इन मोशन' असंही म्हटलं जातं.
पिकअप आणि ड्रॉप-ऑफ सेवा: या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 300 किमीच्या अंतरापर्यंत कुठंही पिकअप आणि ड्रॉप-ऑफ सेवाही पुरवण्यात येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.