Vidhya Balan   Vidhya Balan /Facebook
Image Story

स्त्री आणि पुरुष कलाकारांमध्ये फरक का? विद्या बालनला पडलेय अनेक प्रश्न...

एक अभिनेत्री स्वतःहून चित्रपट चालवू शकत नाही,अशी विचारसरणी असलेल्या लोकांसोबत काम करताना विद्याला संकोच वाटतो.

दैनिक गोमन्तक
Vidhya Balan

परिणीताची लोलिता असो, भूल भुलैयाची चंद्रमुखी असो, द डर्टी पिक्चरची सिल्क स्मिता असो किंवा मिशन मंगलची आनंदी असो, प्रत्येक भूमिकेत विद्या परफेक्ट आहे. विद्या बालन प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करते आणि ती भूमिका परफेक्ट कशी होईल यासाठी प्रयत्न करते. विद्या म्हणते की तिचा नेहमीच प्रभावशाली पात्रे साकारण्यावर विश्वास आहे आणि जेव्हापासून तिला अशा भूमिका मिळू लागल्या, तेव्हापासून विद्याची कारकीर्द देखील वाढली आहे. विद्या बालन बिनधास्त असून तिला नवनविन भूमिका करायला आवडते हे सर्वांना माहीत आहे. ती त्या भूमिकेत पूर्णपणे गुंतलेली असते. (Vidhya Balan Secrets)

Vidhya Balan

स्त्री आणि पुरुष कलाकारांमध्ये फरक का?

विद्या बालनने असेही म्हटले आहे की, तिच्या स्टिरीओ प्रकारातील भूमिकेमुळे कोणी अडचणीत आले असेल तर तिला फरक पडत नाही. जर पुरुष अभिनेता स्टिरिओ प्रकारात खेळत असेल तर कोणालाच काही त्रास होत नाही. मात्र एखाद्या महिनेने तीच भूमिका केली तर तिच्याकडे बघण्याचा प्रेक्षकांचा आणि समाजाता दृष्टिकोन बदलतो. तेव्हा पुरुष आणि स्त्री अभिनेत्याच्या भूमिकेबद्दल असा विचार का केला जातो? असा प्रश्न विद्याने उपस्थित केला आहे.

Vidhya Balan

जीवनात स्थिरता महत्वाची

विद्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल म्हणजे 2007 ते 2008 बद्दल सांगायचे तर, ती स्वत: मानते की त्या वेळी तिने कोणत्याही पात्रात उत्कृष्ट अभिनय केला नाही. तेव्हाच तिच्या लक्षात आले की असे निरर्थक काम सतत करून काही उपयोग होणार नाही. जीवनात कधीकधी स्थिरता आवश्यक असते. या ब्रेकमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की आपण कुठे बरोबर आहात आणि आपण कुठे चुकीचे आहात. आपण आपल्या कामाचे निरक्षण करू शकतो, आपल्या कामात सुधारणा करण्याची ही आपण स्वत:ला दिलेली ही एक संधी असते.

Vidhya Balan

नकारात्मक भूमिका महत्वाची

विद्या बालनला वाटते की स्त्री अभिनेत्रीची भूमिका नकारात्मक व्यक्तिरेखेतून फुलते आणि आजच्या काळात अशा भूमिका देखील वेगळ्या मानल्या जातात, ज्यामध्ये पुरुषांऐवजी महिला कलाकार अशा भूमिका करत आहेत.

Vidhya Balan

नायक किंवा नायिकांमध्ये काय फरक आहे

आपल्या चित्रपटात नायक असो वा नसो याने काही फरक पडत नाही, असे विद्याचे मत आहे. तिने बॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसोबत काम केले आहे आणि आणखी पुढेही मोठे काम करण्याची इच्छा आहे. पण नायिका स्वतःहून चित्रपट चालवू शकत नाही,अशी ज्या अभिनेत्यांची विचारसरणी आहे, अशा लोकांसोबत काम करताना नक्कीच मला संकोच वाटतो, असे विद्याचे म्हणणे आहे.

Vidhya Balan

अनेक अभिनेत्रींनी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत

नकारात्मक भूमिकांबद्दल बोलायचे झाले तर, रेखा, श्रीदेवी, मीना कुमारी, माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासह अभिनेत्रींनी यापूर्वी अनेक वेळा चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता अभिनेत्रींसाठी पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकांचे युग परत येत असल्याचे विद्याला वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT