आयसीसीने टी-20 गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवतीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने एक, दोन नव्हे तर 25 खेळाडूंना क्रमवारीत मागे सोडले. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये वरुणने टॉप 5 गोलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत वरुण 5 व्या क्रमांकावर पोहोचला. त्याचे 679 रेटिंग गुण आहेत. मात्र इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
परंतु टॉप 10 बद्दल बोलायचे झाल्यास, वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावे देखील आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दिसतात. अर्शदीप सिंग नवव्या स्थानावर आहे. तर रवी बिश्नोई आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या नवीन टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर आहे. या इंग्लिश फिरकी गोलंदाजाचे 718 रेटिंग गुण आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिाजचा अकील हुसेन 707 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 698 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा 694 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. म्हणजेच एकूणच आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटूंचा जलवा जलाल पाहायला मिळत आहे.
वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, आणखी एका भारतीय खेळाडूने आयसीसी क्रमवारीत झेप घेतली आहे. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिकवर टीकेची झोड उठली, पण तरीही तो आयसीसी क्रमवारीत नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. तिलक वर्मा 832 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.