Valentine's Day 2023 Dainik Gomantak
Image Story

Valentine's Day: 'ही' रोमँटिक ठिकाणे व्हॅलेंटाईन डे बनवतील खास, 5 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये लुटा आंनद

जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

दैनिक गोमन्तक

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमीयुगलांचा दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस ते खास पध्दताने साजरा करतात. मग ते पती-पत्नी असो किंवा प्रियकर-प्रेयसी असो. या दरम्यान लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतात. जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. या दरम्यान लोक आपल्या जोडीदारांना गीफ्ट देतात.

दुसरीकडे, काही लोक आपल्या जोडीदाराला रोमँटिक डिनर, मूव्ही किंवा डेटवर घेऊन जातात. एकूणच, व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लोक आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी अनेक खास गोष्टी करतात. जर तुम्ही देखील एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल, तर या व्हॅलेंटाईन डे रोजी तुम्ही त्यांच्यासोबत अविस्मरणीय वेळ घालवण्यासाठी ट्रिपला जाण्याचा प्लॅन करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही रोमँटिक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. देशातील या सुंदर आणि रोमँटिक ठिकाणी, तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे एका खास पद्धतीने फक्त पाच हजार रुपयांमध्ये साजरा करू शकाल.

  • कसौल (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेशमध्ये अनेक हिल स्टेशन आहेत, जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. पण जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ट्रिपचा प्लॅन करत असाल तर कसौलला नक्की भेट द्या. दिल्ली ते कसौल हे अंतर 517 किलोमीटर आहे. रेल्वे किंवा रस्त्याने काही तासांचा प्रवास करून तुम्ही कसौलला पोहोचू शकता.आधीच हॉटेलमध्ये रूम बुक करून गेल्यास 500 ते 700 रुपयांत चांगली रूम मिळेल. तुम्ही कसौलला भेट देऊ शकता आणि फक्त 5000 रुपयांमध्ये परत येऊ शकता.

  • धर्मशाळा (हिमाचल प्रदेश)

केवळ 5000 रुपयांमध्ये तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी धर्मशाळेला भेट देउ शकता. कमी बजेट आणि निवांत वातावरणात तुम्ही शिमला-मनालीपेक्षा जास्त रिलॅक्स फिल करु शकता. दिल्ली ते धर्मशाला हे अंतर सुमारे 475 किलोमीटर आहे. तुम्ही फक्त 500 रुपये खर्च करून बस किंवा ट्रेनने धर्मशाळेला पोहोचू शकता. येथे तुम्हाला फक्त 1000 रुपयांमध्ये चांगली हॉटेल्स मिळतील. तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी धर्मशाळा हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Dharamshala
jaipur

जयपूर

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसह खूप थंड ठिकाणी जाणे टाळायचे असेल तर तुम्ही राजस्थानच्या पिंक सिटी म्हणजेच जयपूरला भेट देऊ शकता. कारण जयपूरचे हवामान फेब्रुवारीमध्ये जाण्यासाठी चांगले मानले जाते. इथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक किल्ले, राजेशाही वातावरण कमी पैशामध्ये पाहायला मिळते. दिल्ली ते जयपूर हे अंतर फक्त 300 किलोमीटर आहे. 250 ते 1000 रुपये भाडे खर्च करून तुम्ही बस किंवा ट्रेनने येथे पोहोचू शकता. याशिवाय तुम्ही हॉटेल किंवा होम स्टेमध्ये 500 ते 1000 रुपयांमध्ये रूम बुक करू शकता.

उत्तराखंड

तुम्ही फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडच्या हिल स्टेशनला भेट देउ शकता. लॅन्सडाउन दिल्लीपासून सुमारे 250 किमी अंतरावर आहे. तुम्ही बस किंवा ट्रेनने येथे पोहोचू शकता, त्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 रुपये भाडे द्यावे लागेल. याशिवाय तुम्हाला येथे 500 ते 800 रुपयांमध्ये एका रात्रीसाठी रूम मिळेल.

ताजमहाल

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला भेट द्यायला कोणालाही आवडेल. येथे तुम्ही दिल्ली किंवा आसपासच्या ठिकाणाहून बसमधून येथे येऊ शकता. तुम्ही केवळ 5000 रुपयांमध्ये राहण्यापासून ते फिरण्यापर्यंत ट्रिप प्लॅन करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT