Lakshya Sen  ANI
Image Story

'काहीही अशक्य नाही' थॉमस चषक जिंकून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन परतला मायदेशी

थॉमस कप विजेत्या लक्ष्य सेनला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

दैनिक गोमन्तक
Lakshya Sen

15 मे रोजी थॉमस कप जिंकून भारतासाठी इतिहास रचणारा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सोमवारी रात्री मायदेशी परतला. बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर लक्ष्य सेन माध्यमांना प्रतिक्रिया दिली.'भारतासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे, प्रत्येकजण एक संघ म्हणून एकत्र आला आहे,' असे मत सेनने व्यक्त केले.

Lakshya Sen

लक्ष्य सेनने यावेळी सांगितले की, "फायनलमध्ये पूर्णपणे वेगळे वातावरण होते. मी पहिल्या गेममध्ये संधी गमावल्यामुळे सामन्यात माझी सुरुवात चांगली झाली नाही. मला वाटते की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये बदल घडवून आणला आली खेळाची दिशा बदलत गेली. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही."

Lakshya Sen

पुढे बोलताना सेन म्हणाला की, "आम्ही स्पर्धेत इतक्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले नव्हते पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो; आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता आणि निकालाचा विचार करू नका... कारण काहीही अशक्य नाही."

Lakshya Sen

दरम्यान, टीम मॅनेजर विमल कुमार यांनी सांगितले की, 'सात्विक आणि चिराग हे दुहेरीचे संयोजन म्हणून खरोखरच चांगली कामगिरी करत आहेत. बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या क्रमवारीतही तो पहिल्या दहामध्ये आहे. मला खात्री होती... आम्हाला प्रेरणेची गरज आहे, जेव्हा पंतप्रधानांनी फोन केला तेव्हा मी खूप प्रभावित झालो, तो क्षण खूप खास होता."

Vimal Kumar, Indian badminton team manager

"जेव्हा संघ निश्चित करण्यात आला, तेव्हा हे स्पष्ट होते की आमच्याकडे लक्ष्य, श्रीकांत आणि प्रणॉय हे एकेरीतील सर्वोत्तम तीन खेळाडू आहेत. मला विश्वास होता की जर तो त्याच्या क्षमतेनुसार खेळला तर तो कोणालाही पराभूत करू शकतो. यापूर्वीही त्याने असे केले आहे," असा विश्वास टीम मॅनेज कुमार यांनी टिम बद्दल व्यक्त केला.

Dheerendra Kumar Sen, father of Lakshya Sen

यादरम्यान लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन म्हणाले की, 'जेव्हा पंतप्रधान मोदी बोलले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. त्यांना आमच्या मूळ निवासस्थानाबद्दल देखील माहिती होती, ज्यामुळे त्याला जिंकण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना आमच्याबद्दल माहिती आहे हे आम्हाला आवडले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचाही आम्हाला व्हिडिओ कॉल आला होता.'

Lakshya Sen

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लक्ष्य सेनला राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT