Steve Smith Dainik Gomantak
Image Story

Steve Smith Test Record: 1 धाव काढताच स्मिथनं रचला इतिहास; कोहली-विल्यमसनला पछाडलं

Manish Jadhav
Steve Smith

स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथने पहिली धाव घेताच इतिहास रचला.

Steve Smith

कसोटी फॉरमॅट

आता स्मिथने क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन सारख्या महान खेळाडूंनाही कसोटीत ही कामगिरी करता आलेली नाही.या दोन्ही दिग्गजांना मागे टाकत हा ऑस्ट्रेलियन दिग्गज त्यांच्या पुढे गेला. एवढेच नाही तर कसोटी शतकांच्या बाबतीतही स्मिथ या दोघांपेक्षा पुढे आहे.

Steve Smith

खास रेकॉर्ड

श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने एक खास विक्रम केला, तोही फक्त एक धाव काढून. भारताविरुद्धची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपली तेव्हा स्मिथने कसोटीत 9999 धावा केल्या होत्या. त्याला 10,000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता होती.

Steve Smith

10,000 धावांचा टप्पा

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिली धाव काढताच त्याने हा खास टप्पा गाठला. त्याने 115 सामन्यांपैकी 205 डावांमध्ये ही कामगिरी केली. आता स्मिथ कसोटीत 10,000 धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन आणि एकूण 15 वा फलंदाज बनला आहे.

Steve Smith

कोहली-विल्यमसनला मागे टाकले

विराट कोहली, केन विल्यमसन, जो रुट आणि स्टीव्ह स्मिथ हे 'फॅब फोर' मध्ये गणले जातात. कसोटीत जो रुट आघाडीवर आहे. या तिघांपेक्षा जो रुटच्या नावावर सर्वाधिक कसोटी धावा (12972) आणि सर्वाधिक कसोटी शतके (36) आहेत. आता स्मिथनेही 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. पण भारताचा दिग्गज विराट कोहली आणि न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन अजूनही या आकड्यापासून खूप दूर आहेत. कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 9230 धावा आहेत तर विल्यमसनच्या नावावर 9276 धावा आहेत.

Steve Smith

शतकांच्या बाबतीतही स्मिथ पुढे

कसोटी धावांव्यतिरिक्त, कसोटी शतकांच्या बाबतीतही स्मिथ कोहली आणि विल्यमसनपेक्षा पुढे आहे. केन विल्यमसनने 105 सामन्यांच्या 186 डावांमध्ये 33 शतके ठोकली आहेत, 9276 धावा केल्या आहेत. विराटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 123 सामन्यांच्या 210 डावांमध्ये 30 शतके ठोकली असून 9230 धावा केल्या आहेत. तर स्मिथने या फॉरमॅटमध्ये 34 शतके ठोकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

Goa Police Suspension: पैशांची मागणी, खुनाचा प्रयत्‍न! राज्यात दहा महिन्‍यांत 16 पोलिसांचे निलंबन! खाकी वर्दीवरील काळे डाग चर्चेत

Goa Census: जातनिहाय जनगणना होणार 2027 मध्ये! पुढील वर्षी घरांची गणना; 3 हजार प्रगणकांची नियुक्ती

Uguem: 'आमचा गाव बुडतोय, झाडं कोसळत आहेत'! जबाबदार कोण? उगवे परिसरात स्थानिकांना अवैध रेती व्यवसायाची झळ

SCROLL FOR NEXT