Promise Day 2022 Dainik Gomantak
Image Story

Promise Day: तुमच्या जोडीदाराला देऊ नका कायम सोबत राहण्याचे वचन

हॅपी प्रॉमिस डे (Promise Day 2022) म्हणत तूम्ही आज आपल्या पार्टनरला हे प्रॉमिसेस देण टाळलं पाहिजे.

Priyanka Deshmukh
Promise Day 2022

तरुणांमध्ये व्हॅलेंटाइन वीक किंवा लव्ह वीकची खूप क्रेझ आहे. 7 फेब्रुवारी 2022 रोजी रोझ डेपासून या व्हॅलेंटाइन वीकला (Valentine Week 2022) सुरूवात झाली. फेब्रुवारीच्या या खास आठवड्यात प्रत्येक दिवस अतिशय खास आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Promise Day 2022

जोडीदाराला विशेष प्रॉमिस करणं टाळा

आज 11 फेब्रुवारी 2022 हा प्रॉमिस डे (Love Promises) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला काही खास प्रॉमिस करायचा दिवस असतो. मात्र हॅपी प्रॉमिस डे (Promise Day 2022) म्हणत तूम्ही आज आपल्या पार्टनरला काही वचनं देण टाळलं पाहिजे.

Promise Day 2022

प्रॉमिस डे का साजरा करायचा?

सहसा एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण तरीही, व्हॅलेंटाईन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून हे दिवस साजरे केले जातात. आपण आपल्या साथिदारासोबत कोणत्याही परिस्थितीत एकत्र जगण्याचे आणि मरण्याचे वचन दिले असेलच परंतु आज 11 फेब्रुवारी 2021 रोजी या वचनाची पुनरावृत्ती करू नका. त्यामुळे या दिवशी आपल्या पार्टनरला असे काही वचन देणे टाळा.

Promise Day 2022

1. उत्तम आरोग्य देणार असे वचन देऊ नका

करोना व्हायरसने आरोग्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. या प्रॉमिस डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला मी तुला चांगले आरोग्य देईल असे वचन देवू नका. कारण आपल्या पार्टनरला या कोरोना काळात स्वत:ची काळजी स्वत: घेणे जास्त गरजेचे आहे. कारण आपल्या पार्टनरला कोरोना झाला म्हणून आपण क्वारंटाइन होत नाही म्हणून यावेळी आपल्या पार्टनरला स्वत:ची काळजी घेणे शिकवा आपल्या शरिराचे, मानसिक आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायला सांगा. अनेक वेळा लोक आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर होतात, तेव्हा आपल्या पार्टनरला फिटनेसचे महत्व समजून सांगा.

Promise Day 2022

2. सोबत राहण्याचे वचन देऊ नका

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणात तुम्ही त्याच्यासोबत असाल यात शंका नाही. मात्र यावेळी बदलत्या काळानुसार आपआपली जिवनशैली बदलली आहे. त्यामुळे कुणावर डिपेंड न राहता स्वत:ला कसे घडवायचे हे आपल्या पार्टनरला शिकवा. आपल्या पार्टनचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी एकमेकांना नेहमीच साथ द्या. कारण याच आयुष्याचा सुरवातीच्या प्रवासात आपल्या पार्टनरला मानसिक आधाराची जास्त गरज असते.

Promise Day 2022

3. सोबत फिरण्याचे वचन देऊ नका

तुम्ही दोघंही एकमेकांसोबत खूप वेळ घालवता हे मान्य, पण कधी कधी बाहेर फिरायला जाणंही खूप गरजेचं असतं. पण कामाच्या व्यापामुळे तुम्ही कधी कधी बाहेर फिरायला जावू शकत नाही. त्यामुळे आपल्या पार्टनर सोबत केलेला प्लॅन रद्द होतो. तेव्हा आपल्या पार्टनरला एकटं बाहेर फिरण्याचं स्वत:ला एक्सप्लोर करण्याचं स्वातंत्र्य द्या. घर-ऑफिसच्या तणावापासून दूर व्हायचं असेल तर कधी कधी आपआपली स्पेस घ्या. आपआपली प्रायव्हसी जपा. कारण कोविड काळात बाहेर जाणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाण टाळलं पाहिजे. तुमच्या या प्रॉमिसमुळे तुमच्या नात्यात नाविण्य येवू शकतो.

Promise Day 2022

4. सोशल मिडियापासून स्वतःला दूर ठेवणार असे म्हणू नका

कधी कधी आपण एकमेकांच्या सोबत राहूनही सोबत नसतो. माणसांच्या गर्दीत आपण एकटेच मोबाईलमध्ये व्यस्त असतो. खरं तर मोबाईल आधूनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. सोशल मिडिया आपल्याला नोकरीची संधी, मार्केटिंगची संधी, आवश्यक माहिती देतो त्यामुळे सोशल मिडियावर वेळ घालवायलाच हवा. मात्र या सोशल साइट्सला किती आणि कधी वेळ द्यायचा हे आपण आपल्या पार्टनरला सांगितलं पाहिजे. या वेळेचे नियोजन केल्यास तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही. दररोज थोडा वेळ एकमेकांसाठी कायम ठेवण्याचे नियोजन करा. त्यावेळी फक्त स्वतःबद्दल बोला आणि प्रेमाने जगा.

Promise Day 2022

5. कायम प्रेम करत राहणार असे म्हणू नका

प्रत्येक जोडप्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही समस्या इतकी मोठी नसते की त्या समस्येवर मात करता येणार नाही. तुमच्या हृदयात एकमेकांबद्दल असेलले प्रेम आदरपुर्वक असायला पाहिजे. मी खूप प्रेम करतो/करते असे म्हणत असताना आपल्या माणसांचा आदर करणे पण तेवढच महत्वाचं असतं. आपल्या पार्टनरची चुक असल्यास ती समजून सांगा. त्याचा किंवा तिचा काय प्रॉब्लेम आहे हे आधी समजून घ्या आणि पार्टनरच्या भावनांचा आदर करा. म्हणून यावेळी भांडण करून एकमेकांना घालून पाडून बोलण्यापेक्षा प्रेमाने बोलून मार्ग काढा. लक्षात ठेवा एक प्रेमाचा शब्द आपल्या नात्यासाठी वरदान ठरू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT