Paragliding Spots Dainik Gomantak
Image Story

Paragliding Spots: भारतातील सर्वात सुंदर पॅराग्लाइडिंग स्पॉट्स

गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये धाडसी प्रवासाची क्रेझ वेगाने वाढली आहे. यात पॅराग्लाइडिंगचा देखील समावेश आहे ज्याला हल्ली तरूणांनी खूप डोक्यावर घेतले आहे. बघूया भारतातील सर्वात प्रसिद्ध पॅराग्लाइडिंग स्पॉट्स (Paragliding Spots)

Priyanka Deshmukh
Paragliding Spots

बीर बिलिंग:- हिमाचल प्रदेशमधील बीर बिलिंग पॅराग्लाइडिंगसाठी भारतातील सर्वोत्तम स्थान मानले जाते. हेच कारण आहे की लहान, मध्यम आणि लांब उड्डाण सेशन इथेच केले जाते. या ठिकाणी पॅराग्लाइडिंग ऑपरेटर भरपूर प्रमाणात आहेत. बिलिंग टेक ऑफ पॉइंट हा आशियातील सर्वोच्च पॉइंट आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पॉइंट आहे. जो समुद्रसपाटीपासून सुमारे 8000 फूट उंच आणि लँडिंग 4000 फूट उंचावर आहे. बीर बिलिंगमध्ये पॅराग्लाइडिंगसाठी ऑक्टोबर ते जून हा सर्वोत्तम हंगाम आहे. (Most beautiful And Famous paragliding spots in India)

Paragliding Spots

नंदी हिल्समधील पॅराग्लाइडिंग:- बेंगळुरूपासून ६० कि.मी. अंतरावर नंदी हिल्स स्टेशन आहे. हा दक्षिणेकडील एक लोकप्रिय पॅराग्लाइडिंग स्पॉट आहे. 4500 फूटांपेक्षा जास्त उंचीवर ओपन एअरमध्ये पॅराग्लाइडिंग अगदी चांगल्या पद्धतीने करता येते. पावसाळ्यातील हे दिवस बंगळुरू आणि हैदराबादमधील तरुणांसाठी अगदी लोकप्रिय पॅराग्लाइडिंग पॉईंट बनला आहे. येथे आपण पावसाळा वगळता वर्षभर पॅराग्लाइडिंगवर जाऊ शकता.

Paragliding Spots

शिलॉग-मेघालय:- बर्फाच्छादित पर्वत, उंच झाडे आणि विस्तीर्ण परिसर असलेले मेघालय पर्यटक प्रेमींना एक सुखद अनुभव देते. पॅराग्लायडिंगसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. या भागात पॅराग्लाइडिंगसाठी सप्टेंबर ते एप्रिल हा सर्वात चांगला महिना आहे.

Paragliding Spots

पाचगणी- महाराष्ट्र:- पॅराग्लाइडिंग च्या स्पॉट ट्रेनिंग आणि फ्लाइंगसाठी हा स्पॉट अत्यंत सुरक्षित समजला जातो. इथल्या हिरव्यागार पर्वत रांगा, मैदाने, हिरव्यागार टेकड्यांमधून पॅराग्लाइडिंग करतांना एक वेगळा आणि सुखद अनुभव मिळतो. आपण आपल्या मित्रांसह या ठिकाणी जावून आनंद घेऊ शकता.

Paragliding Spots

मनाली-सोलंग व्हॅलीमधील पॅराग्लाइडिंग:- तुम्हाला मनालीमध्ये अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायची असेल तर सोलंग व्हॅलीमध्येही पॅराग्लाइडिंगचा आनंद घेता येईल. पॅराग्लाइडिंग दरम्यान, हिमालयातील निसर्गरम्य दृश्य आणि गवताळ प्रदेशांचे सुंदर दृश्य आपण पाहू शकता. पावसाळ्याशिवाय इतर कोणत्याही हंगामात तुम्ही येथे पॅराग्लाइडिंगसाठी जाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT