Take a ferry ride at these top places
Take a ferry ride at these top places Dainik Gomantak
Image Story

Monsoon Travel: फेरी राईडचा आनंद घेण्यासाठी 'या' चार ठिकाणांना नक्की भेट द्या

दैनिक गोमन्तक

लोकं दरवर्षी त्यांच्या आवडत्या ठिकाणांना जाण्याचा प्लॅन करतात. भारतात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. जिथे दरवर्षी भारत आणि परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु कोरोना माहामारीमुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन (Lockdown) असल्याने पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. पण पुन्हा एकदा भारतातील जवळपास सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या संख्येने लोक त्यांच्या आवडत्या ठिकाणांना भेट देण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना फेरी राईड करायला आवडते. जर तुम्हाला सुद्धा फेरी राईड (Ferry Ride) करायची असेल तर भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

* मुंबई

मुंबईला मायानगरी म्हणून ओळखली जाते. तुम्हाला जर फेरी राईडचा (Ferry Ride) आनंद घ्यायचा असेल तर मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाला नक्की भेट द्या. ही राईड तुम्हाला एलिफंटा बेटावर देखील घेवून जाईल.

* चिल्का लेक

ओडिसमध्ये असलेल्या चिल्का लेकवर तुम्ही फेरी राईडचा (Ferry Ride) आनंद घेवू शकता. तसेच तेथे विविध पक्षांच्या प्रजाती देखील आपल्याला पाहायला मिळतील. येथे पावसाळ्याच्या दिवसात फेरी राईड करण्याचा आनंद वेगळा असतो.

* वेम्बनाड तलाव

केरळमधील वेम्बनाड तलावामध्ये तुम्ही फेरी राईडचा (Ferry Ride) आनंद घेवू शकता. तसेच येथे हाऊस बोटची सुविधा उपलब्ध असून येथे मासेमारी करता येते. केरळच्या कोट्टायम जिल्हयापासून वेम्बनाड तलाव 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

* कोची

कोचीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने लोक फेरी राईडचा (Ferry Ride) आनंद घेण्यासाठी येत असतात. हे ठिकाण कपलसाठी हनीमून डेस्टीनेशन म्हणून प्रसिद्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

SCROLL FOR NEXT