Mohammed Shami Dainik Gomantak
Image Story

Mohammed Shami Wickets: शमीचा बांगलादेशविरुद्ध धमाका, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खोलला 'पंजा'

Manish Jadhav
Mohammed Shami

स्टार गोलंदाज मोहम्मद शमी

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शानदार पुनरागमन केले. आपल्या विस्फोटक गोलंदाजीने धुमाकूळ घातला. 2023च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्यानंतर दुखापतग्रस्त झालेला मोहम्मद शमी एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर लगेचच, शमीने पुन्हा एकदा त्याच्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना थक्क केले. शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स आपला जलवा दाखवून दिला.

Mohammed Shami

शमीचा पंजा

2013 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा शमी त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघात असूनही, शमीला खेळण्याची संधी मिळाली नाही पण यावेळी तो संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात, शमीने एकट्याने बांगलादेश संघाला घरचा रस्ता दाखवला.

Mohammed Shami

पहिल्या षटकापासून शमीचा जलवा दिसला

शमीने डावाच्या पहिल्या षटकापासूनच आपला जलवा दाखवून दिला. सामन्याच्या सहाव्या चेंडूवर सलामीवीर सौम्य सरकारची विकेट घेतली. त्यानंतर सातव्या षटकातही शमीने बांगलादेशला धक्का देत मेहदी हसन मिराजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, जेव्हा झाकीर अली आणि तौहीद हृदय यांच्यात शतकी भागीदारी होत असताना टीम इंडियाला विकेटची गरज होती, तेव्हा शमीने झाकीर अलीची विकेट घेऊन भागीदारी मोडली. त्याने झाकीरची विकेट घेऊन 200 एकदिवसीय विकेट्सही पूर्ण केल्या. त्यानंतर शमीने तंजीम हसन सकीब आणि तस्किन अहमद यांच्या विकेट्स घेत पंजा खोलला.

सर्वाधिक 5 विकेट्स

यासह, शमीने त्याच्या 104 एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत सहाव्यांदा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे शमीने आयसीसी स्पर्धांमध्ये 5 वेळा हा पराक्रम केला आहे, जो एक विश्वविक्रम आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजाने एका डावात इतक्या वेळा 5 विकेट्स घेतलेल्या नाहीत. एवढेच नाही तर शमीने फक्त 5126 चेंडूत 200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करुन विश्वविक्रमही रचला. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या या स्टार भारतीय वेगवान गोलंदाजाने आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये फक्त 19 सामन्यांमध्ये 60 विकेट्स घेत झहीर खानचा (59) विक्रम मोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT