Mouni Roy Wedding Insta/@imouniroy
Image Story

मौनी रॉयला करावे लागले वेडिंग रिसेप्शन रद्द

मौनीने लग्नाच्या काही दिवसानंतर मुंबईतील मित्र परिवारासाठी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते

दैनिक गोमन्तक
Mouni Roy Wedding

टीव्ही स्टार मौनी रॉय (Mouni Roy) काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री 27 जानेवारीला उद्योगपती सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या अभिनेत्रीचे लग्न गोव्यात थाटामाटात पार पडणार आहे. त्याचवेळी, मौनी रॉय लग्नासाठी काही खास लोकांनाच आमंत्रित करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर मुंबईत ती तिच्या इंडस्ट्रीतील मित्र आणि स्टार सेलिब्रिटिजना लग्नाच्या रिसेप्शनला आमंत्रित करणार होती. पण आता मौनीने तिच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द केल्याचे वृत्त आहे. मौनीने लग्नाच्या काही दिवसानंतर मुंबईतील मित्र परिवारासाठी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. (Mouni Roy Wedding Reception)

Mouni Roy Wedding

या कारणामुळे मौनीने रिसेप्शन पार्टी रद्द केली

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मौनीने आता हे रिसेप्शन रद्द केले आहे. सूत्रानुसार- 'मौनी आणि सूरजने त्यांच्या मित्रांसाठी लग्नानंतर एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. पण कोविड 19 चा धोका लक्षात घेऊन त्यांना ही पार्टी रद्द करावी लागली. कोविडच्या वाढत्या संक्रमणाचा दोका लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य राखत मौनीने हा निर्णय घेतला आणि आपले सर्व लक्ष लग्नाच्या कार्यक्रमावर केंद्रित केले.

Mouni Roy Wedding

आरटी पीसीआरशिवाय प्रवेश नाही

अभिनेत्री मौनीला लग्नासा निमंत्रीत केलेल्या अनेक लोकांची नावे कमी करावी लागली. कोविडच्या पार्श्वभूमीवर मौनीने पाहुण्यांच्या यादीतून अनेकांची नावे कापली. ज्यांच्याकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट असेल तेच लग्नात प्रवेश करू शकणार आहे. कार्यक्रमस्थळावरील प्रत्येक पाहुण्याकडून आरटी पीसीआर अहवालही मागवला जाणार आहे. त्यानंतरच पाहुण्यांना लग्नाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल.

Mouni Roy Wedding

मौनी सूरजचे लग्न वेगवेगळ्या रितीरिवाजानुसार होणार

मौनी रॉय आणि सूरज बंगाली आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार लग्ण करणार आहे. गोव्यातील रोमँटिक व्हाईट वेडिंगनंतर दोघेही पूर्ण हिंदू रितीरिवाजाने लग्नबंधनात अडकणार आहेत. मौनीच्या लग्नाचे इव्हेट्स लवकरच सुरू होणार आहे. 26 जानेवारीपूर्वी संगीत, मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम होणार तर दुसरीकडे, सूरज आणि मौनी 26 रोजी बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. या लग्नाला एकूण 27 ते 50 लोक उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT